सोलापूर : श्री निलकंठेश्वर प्रभू यांच्या रथोत्सवानिमित्त श्री कुर्हिनशेट्टी ज्ञाती संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला रथोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. गुरुवार पेठ येथील श्री निलकंठेश्वर देवालयात रथोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली होती.रथोत्सवाच्या प्रारंभी सोलापूरचे महापौर श्री विनायक कोंड्याल यांच्या हस्ते रथाचे पूजन व पालखीचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर श्री निलकंठेश्वर प्रभूंच्या रथाची मिरवणूक भक्तिमय वातावरणात सुरू करण्यात आली.रथोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. पारंपरिक वाद्यांचा गजर, भक्तिमय वातावरण आणि श्री निलकंठेश्वर प्रभूंच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. भाविकांनी रथाचे दर्शन घेत श्रद्धापूर्वक सहभाग नोंदविला.यावेळी नगरसेवक मेघनाथ येमूल,श्री कुर्हिनशेट्टी ज्ञाती संस्थेचे चेअरमन अंबादास कणकी,अध्यक्ष नारायणराव संगा, प्रसिडेंट बसवराज बंडा, उपाध्यक्ष सिद्धेश्वर भोगडे सेक्रेटरी संजय भोगडे सह सेक्रेटरी श्रीनिवास गडगी, खजिनदार श्रीनिवास जोगी प्रभाकर गोरंटी श्रीनिवास बुट्टा पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.