श्रीपूर – श्रीपूर येथील इंदिराबाई आगाशे इंग्लिश मिडीयम स्कूल च्या सहशिक्षिका करुणा मधुकर धाइंजे यांना आदर्श क्रिडा शिक्षक पुरस्कार जाहीर झाला . सोलापूर जिल्हा शारिरीक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ व स्वेरीज कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शहर तालुक्यात क्रिडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना आदर्श क्रिडा शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते . या अनुषंगाने श्रीपूर येथील इंदिराबाई आगाशे इंग्लिश मिडीयम स्कूल च्या सहशिक्षिका करुणा मधुकर धाइंजे यांना उत्कृष्ट कामगिरी बद्दल आदर्श क्रिडा शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार पंढरपूर येथे सव्वीस ऑगस्ट रोजी स्वेरीस कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पंढरपूर मध्ये प्रदान करण्यात येणार आहे. करुणा धाइंजे यांना आदर्श क्रिडा शिक्षक पुरस्कार मिळाले बद्दल आबासाहेब देशमुख चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष डॉ रामदास देशमुख व सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत करुणा धाइंजे याच विद्यालयाचा माजी विद्यार्थिनी आहेत . त्यांना राज्यपातळीवर भालाफेक, गोळा फेक, स्पर्धात पदके मिळाली आहेत . तसेच खो खो, कब्बडी, क्रिकेट, ऊंच उडी भालाफेक गोळा फेक यामध्ये अनेक खेळाडू घडवले आहेत या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे . प्रशालेचे प्राचार्य पांडुरंग बनसोडे , इंदिराबाई आगाशे इंग्लिश मिडीयम स्कूल चे प्रा . सुर्यवंशी, चंद्रशेखर विद्यालय प्राथमिक शाळा मुख्याध्यापक शंकर यादव यांनी अभिनंदन केले आहे .
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


















