बार्शी – येथील श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालयात महामानव भारतरत्न, बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वाचनालयाचे ऑ. सेक्रेटरी आनंद पुनमिया, संचालक प्रमोद भंडारी व श्री जैनाश्रमचे ऑ. सेक्रेटरी ऍड. दिनेश श्रीश्रीमाळ यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. वाचनालयाचे पदाधिकारी व संचालक मंडळ उपस्थित होते. ॲड. दिनेश श्रीश्रीमाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी वाचक वर्ग व सभासद,बी.एम.जाधव, भारत गोणेकर, सलीम शेख, मधुकर गोणेगावकर आदी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालक प्रमोद भंडारी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश यादव, सहा. ग्रंथपाल सौ. शितल लुकडे, क्लार्क विराज पतंगे यांनी परिश्रम घेतले.






















