सोलापूर – आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलांच्या गटात सोशल उर्दू हायस्कूलने अजिंक्यपद पटकाविले.
डब्ल्यू. आय. टी. इंजिनिअरिंग कॉलेज येथे झालेल्या या स्पर्धेत त्यांनी उपांत्य फेरीत आय. एम. एस.शाळेवर ३-१ गोलने पराभव केला. अंतिम सामन्यात हरिभाई देवकरण प्रशालेवर ४-३ गोलने मात केली. यात फरहान शेख, अमीर काझी, नेहाल हत्तुरे, फैजान पठाण, मुईज तुळजापूरे, हमजा किल्लेदार या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या संघाची रोजी पुणे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. संघास क्रीडा शिक्षक अ.रहिम शेख, अलिम शेख व आवेस मर्चंट यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. अखलाक वडवान, मुख्याध्यापक रसूल चौधरी, उपमुख्याध्यापक इम्तियाज शाब्दी, पर्यवेक्षिका यास्मिन शेख, पर्यवेक्षक अल्ताफ कुमठे आदींनी अभिनंदन केले.
—–
Post Views: 42