बार्शी – केशवराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, धाराशिव येथे दि. ९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत सोजर कॉलेज ऑफ फार्मसी, खांडवी (बार्शी) येथील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले. सदर पोस्टर सादरीकरण स्पर्धेत तीन राज्यांमधून एकूण ७८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या डी फार्मसी द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी कु. सुवर्णा हापसे आणि कु. पायल गुजर यांनी हर्बल मेडिसिन ऑपॉर्च्युनिस्टिक अँड चॅलेंजेस” विषयावरती उत्कृष्ट पोस्टर सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे.
हर्बल औषधांचे वाढते महत्त्व, त्यातील उपलब्ध संधी, औषध निर्मितीतील आधुनिक दृष्टिकोन, गुणवत्ता, सुरक्षितता तसेच हर्बल मेडिसिनसमोरील विविध आव्हाने या विषयांचा विद्यार्थिनींनी प्रभावीपणे आढावा घेतला. त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीला परीक्षकांकडून विशेष दाद मिळाली. सदर उल्लेखनीय यशाबद्दल
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजित करपे यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे कौतुक करत, विद्यार्थ्यांनी अशा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन महाविद्यालयाच्या शैक्षणिक व संशोधनात्मक कार्याला अधिक बळकटी द्यावी, असे आव्हान केले.
या स्पर्धेसाठी विद्यार्थिनींना डॉ. स्वप्नील पोळ, प्रा. स्नेहा काळे व प्रा. संतोष मोकाशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
महाविद्यालयाच्या या यशाबद्दल सोजर फार्मसीच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला.या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरुणदादा बारबोले व सौ. कल्पनाताई बारबोले यांनी यशस्वी विद्यार्थिनी, मार्गदर्शक प्राध्यापक वृंद, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन करुन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.