वळसंग – अत्यंत मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर नचिकेत अपर्णा उमेश बाबानगरे याने वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेश परीक्षेत प्रथम प्रयत्नात (NEET) ५४३ गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याला ऑल इंडिया रँक ४३,२५१ तर महाराष्ट्र राज्य रँक ३,१५५ मिळाली आहे.
या गुणवत्तेच्या जोरावर नचिकेतची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Government Medical College) MBBS अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. त्याच्या या यशामुळे बाबानगरे कुटुंबाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. नचिकेत हा प्राचार्य, D.Ed. कॉलेज, अक्कलकोट तसेच प्रचंडे हायस्कूल, नागणसूर येथे शिक्षक म्हणून कार्यरत राहिलेले श्री.कल्लप्पा मलकप्पा बाबानगरे यांचा नातू आहे. शिक्षणाची परंपरा आणि संस्कारांचा वारसा पुढे नेत नचिकेतने वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवून कुटुंबासाठी एक ऐतिहासिक क्षण निर्माण केला आहे.
Post Views: 19