सोलापूर : १५ लाख रुपये किमतीची इनोवा कार स्वतःच्या नावावर खरेदी करायला लावून बँकेचे हप्ते न भरता विश्वासघात केल्याप्रकरणी एकावर जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश प्रल्हाद उबाळे (रा. भीम नगर, शेळगी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून याबाबत श्रीशैल राजशेखर निंबाळकर (वय ४३, रा. रामराज्य नगर, शेळगी) यांनी फिर्याद दिली आहे.
यातील आरोपी राजेशने मे २०२३ पासून आजतागायत यातील फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांच्या नावावर १५ लाख रुपये किमतीची इनोवा कार खरेदी केली. मात्र, त्यानंतर बँकेचे हप्ते भरले नाहीत. यामुळे फिर्यादी निंबाळकर यांनी गाडी परत मागितली असता आरोपीने त्यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास फौजदार येडे हे करीत आहेत.
Post Views: 11