सांगोला – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आयोजित आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत सांगोला महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावले. यामुळे खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष तात्यासाहेब केदार व प्रा.प्रबुध्दचंद्र झपके, सचिव ॲड.उदयबापू घोंगडे, सहसचिव साहेबराव ढेकळे, खजिनदार नागेश गुळमिरे यांनी विजेत्या संघांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संघास प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले व शारीरिक शिक्षण संचालक डॉ.जगदीश चेडे यांनी मार्गदर्शन केले.
Post Views: 5