सोलापूर : छत्रपती संभाजी महाराज तलाव सुशोभीकरण कामामधे करोडो रुपयांचा कथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषीवर फौजदारी कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने विजापूर रोडवरील छत्रपती संभाजी महाराज तलाव येथे थाळीनाद आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी थाळ्या वाजवून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. छत्रपती संभाजी महाराज तलाव हे राजकारण्यांना भ्रष्टाचार करण्याचं कुरण झालं आहे प्रस्तावित पाच कोटी कामाला संभाजी ब्रिगेडचा विरोध असून आधी बारा कोटीची केलेली कामे दाखवा तलाव सुशोभीकरणाच्या कामांमध्ये आर्थिक अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करत संबंधित अधिकारी, कंत्राटदार व जबाबदार व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे मा. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनल दास, विकास तीरेकर, शेखर भोसले, फिरोज सय्यद, संतोष सुरवसे, इशरद नागोरे, प्रकाश डोंगरे, शिरीष जगदाळे, राहुल मेरू, अनिता वाघमारे, जयश्री रानसर्जे, दादाराव कदम, रमेश हबु, राजेश रानसरजे आदी उपस्थित होते.

















