
सोलापूर : महाराष्ट्र नाभिक महामंडळ व समाजामध्ये फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला नाभिक समाजाचा वधू-वर पालक परिचय मेळावा तसेच सामुदायिक विवाह सोहळा शनिवार, दि. २३ मे २०२६ रोजी सोलापूर येथे मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११ वाजता वधू-वर पालक परिचय मेळाव्याने झाली. यावेळी श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सोलापूरच्या खासदार प्रणिताताई शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमास महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे, एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. बापूसाहेब अडसूळ, भाजप नगरसेवक प्रथमेश कोठे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश राऊत, उद्योजक नितीन दूरलेकर, वैभव शेटे, कलबुर्गी येथील नाभिक समाजाचे अध्यक्ष शरण बसवेश्वर सूर्यवंशी, पांडुरंग चौधरी, किशोर शेटे, भीमराव गंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शिक्षक मित्र पुरस्काराने मंगेश चिवटे यांचा सन्मान करण्यात आला. प्रा. डॉ. बापूराव अडसूळ यांना ‘शिक्षक भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. कला क्षेत्रातील योगदानाबद्दल अश्विनीताई तडवळकर यांना ‘कला गौरव रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले. समाजसेवक संजय चिखले यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तसेच बापूराव चव्हाण यांना ‘ज्ञानज्योती जीवनगौरव’, किरण भांगे व शिवशरण सुरवसे यांना ‘समाजरत्न’, सुदर्शन विभुते व तुकाराम शिंदे (पंढरपूर) यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मोहोळ येथील नेताजी कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय काशीद यांनाही ‘ज्ञानज्योती जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याच प्रसंगी प्रणिताताई शिंदे, कल्याण दळे, प्रा. डॉ. बापूसाहेब अडसूळ, पांडुरंग चौधरी व वैभव शेटे यांच्या हस्ते वधू-वर परिचय मेळाव्याच्या ‘शिवयोग’ या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आलेला नाभिक समाजाचा सामुदायिक विवाह सोहळा अत्यंत आनंददायी वातावरणात आणि पारंपरिक थाटात पार पडला. या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, सौ. कोमलताई ढोबळे, प्रा. डॉ. बापूसाहेब अडसूळ, नगरसेवक संजय कोळी, भीमराव गंगरे, किशोर शेटे, दत्तात्रय वानकर, वैभव शेटे, पांडुरंग चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजक वैभव शेटे, जिल्हाध्यक्ष संजय चिखले, युवक अध्यक्ष श्रीकांत राऊत, आनंद वाघमारे, संदीप पवार, सुदर्शन विभुते, मनोज डिगे, गणेश वाघमारे, बापूराव काळे, सहदेव वाघमारे, शिवशरण सुरवसे, बाळासाहेब वाळके, सुभाष सुरवसे, लक्ष्मण विभुते, अतुल राऊत, सुधीर माने, श्रीशैल सुरवसे, संदीप राऊत, अनिल विभुते, मल्लिनाथ लोखंडे, प्रकाश वाघमारे, सोमनाथ झुंजारे, विश्वजीत कासवदे, वैभव चौधरी, विशाल सपकाळ, किरण शेटे, राकेश कोरे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष सुरवसे यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांचे आभार शिवशरण सुरवसे यांनी मानले.
Post Views: 8