बार्शी – महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटना, शाखा बार्शीची त्रैवार्षिक निवडणूक उत्साहात आणि सौहार्दपूर्ण वातावरणात बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत सर्व सदस्यांच्या सर्वानुमते नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून, तालुकाध्यक्षपदी अतुल जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे.
या नव्याने घोषित झालेल्या कार्यकारिणीमध्ये तालुका पातळीवरील विविध महत्त्वाच्या पदांवर खालीलप्रमाणे बिनविरोध निवडी करण्यात आल्या.
नूतन कार्यकारिणी पदाधिकारी- तालुकाध्यक्ष: अतुल जगताप. जिल्हा कार्यकारणी सदस्य- गणेश पाटील व संतोष जगदाळे. कार्याध्यक्ष- सुरज काशीद. सचिव- धनंजय पोळ. खजिनदार- पी. एस. नागटिळक. प्रसिद्धी प्रमुख- के. एल. काळेल. उपाध्यक्ष- कृष्णात शेळके, बी. पी. कोलगे, एस. एच. साठे व श्रीमती आर. ए. पुजारी. महिला प्रतिनिधी- आर. पी. दराडे, पी. ए. गेंड व जे. जे. कापसे.
या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे नियोजन आणि पारदर्शकता जपण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विशाल गावडे व वराळे यांनी कुशलतेने काम पाहिले.
निवडणूक बिनविरोध पार पडल्याबद्दल बार्शी तालुक्यातील कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले असून, कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही कार्यकारिणी कटिबद्ध राहील, असा विश्वास नवनिर्वाचित अध्यक्षांनी व्यक्त केला.
Post Views: 6