श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निकमधील संगणक अभियांत्रिकी विभागाकडून द्वितीय वर्ष संगणक अभियांत्रिकी विद्यार्थींनीसाठी पीएल/एसक्यूएल विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानात व व्यावहारिक कौशल्यांमध्ये वाढ व्हावी तसेच अभ्यासक्रमातील संकल्पनांचे सखोल ज्ञान मिळावे आणि त्यांचा प्रत्यक्ष वापर करता यावा, हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.
कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना पीएल/एसक्यूएलच्या मूलभूत संकल्पना व्हेरिएबल्स, कंट्रोल स्टेटमेंट्स, कर्सर्स, प्रोसीजर्स, फंक्शन्स तसेच माहिती व्यवस्थापन प्रणालीमध्ये पीएल/एसक्यूएलचा व्यावहारिक उपयोग याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विविध उदाहरणे व प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विषय समजावून सांगण्यात आला. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध उपक्रम व प्रात्यक्षिक सत्रांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
ही दोन दिवसीय कार्यशाळा टेक गुरुकुल चे ट्रेनर कु. सानिका दरजी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली. त्यांनी विद्यार्थ्यांना पीएल/एसक्यूएलमधील विविध संकल्पना सोप्या व प्रभावी पद्धतीने समजावून सांगत माहिती व्यवस्थापनामध्ये पीएल/एसक्यूएलचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करून त्यांना प्रत्यक्ष कार्यपद्धतीचे मार्गदर्शन केले.मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून अशा प्रकारच्या तांत्रिक कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्यासोबतच त्यांच्या व्यावहारिक कौशल्यांचा विकास होण्यास मदत होते, असे सांगितले.
कार्यशाळेच्या दोन्ही दिवसांत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यशाळेच्या यशस्वी समारोपानंतर सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांनी कार्यशाळेबद्दल समाधान व्यक्त करत भविष्यातही अशा प्रकारच्या तांत्रिक कार्यशाळांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे प्राचार्य प्रा. गजानन धरणे यांनी केले व प्रा. नवनाथ माने संगणक विभागप्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. जान्हवी राठोड यांनी केले. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रा. ऐश्वर्या कुलकर्णी, प्रा. शरयू कवठेकर, सायली माळवदकर, स्वाती हिरेमठ आणि विपिन जडल यांनी मोलाचे सहकार्य केले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















