Wednesday, September 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वारकरी संप्रदायाच्या वतीने लवांडेंच्या अटकेची मागणी

तरुण भारतbyतरुण भारत
April 19, 2026
in editor
0
वारकरी संप्रदायाच्या वतीने लवांडेंच्या अटकेची मागणी
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – वारकरी सांप्रदायातील महाराज मंडळीची यादी जाहीर करून त्यांना घूसखोर संबोधणार्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक करण्याची मागणी येथील बैठकीत आज करण्यात आली.

पंढरपूरातील वारकरी संप्रदायातील सर्व फडकरी, मठाधिपती,दिंडीमालक, संस्थानिक, पंढरपूर मधील वारकरी संप्रदायावर प्रेम करणारे स्थानिक नागरिक यांची एक संयुक्त बैठक शनिवारी पार  पडली. या बैठकीत संतांचे वंशजयांसह संप्रदायातील समस्त वारकरी फडकरी समाज संघटना, वारकरी संप्रदाय पाईक संघ, विश्व वारकरी संघ,विश्व वारकरी सेना , अखिल वारकरी भाविक मंडळ इ.संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

नुकतेच राष्ट्रवादी पक्ष (श.प.) गटप्रमुख शरद पवार यांनी केलेले वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाली असल्या विषयक वादग्रस्त लेखन,त्या पाठोपाठ पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी संप्रदायात पुज्यस्थानी असणाऱ्या मान्यवर महाराज मंडळींची नावे जाहीर केली होती. या घटनांमुळे वारकरी संप्रदायात अत्यंत संतापाची लाट उसळलेली आहे. संप्रदायाच्या सर्व स्तरातून तर निषेध होतोच आहे.मात्र संप्रदायावर अकृत्रिम प्रेम करणारा लाखोंचा सर्वसामान्य समाज वारकरी संप्रदायाला निष्कारण राजकिय पक्ष लक्ष्य करत असल्याचे पाहून क्रोधाविष्ट झाला आहे. ज्या वीस महाराज मंडळींची नावे घुसखोर म्हणून जाहिर केली आहेत.ते लोक म्हणजे ज्यांनी ज्ञानोबा तुकोबारायादी संतांच्या पश्चात हा वारकरी संप्रदाय जतन आणि संवर्धित केला अशा शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या दिव्य परांपरांचे जेष्ठ अधिकारी मंडळी आहेत. यात प्रामुख्याने बंडा तात्या कराडकर हे संप्रदायातील जेष्ठ वारकरी ज्यांनी वारकरी म्हणून सर्वोच्च सेवेचा मापदंड तर केलाच आहे.पण जगद्गुरु तुकोबारायांची तपोभूमी भंडारा डोंगर वाचवण्यासाठी ‘डाऊ’ सारखी विषारी वायू उत्पन्न करणारी कंपनी जाळून लाखो जणांचे प्राणच जणू वाचवले होते. देगलूरकर घराण्याने चातुर्मासात पंढरपूरची सिमारेषा ओलांढायची नाही यासाठी आपल्या तत्कालीन वतनांवर पाणी सोडलेले आहे स्वतः चंद्रशेखर महाराज हे आपल्या प्रकांड विद्वत्तेने सकल वारकऱ्यांच्या ह्रदयस्थानी विराजमान आहेत. वासकर महाराज हे त्या परंपरेचे गादीप्रमुख आहेत ज्या ब्रह्मलीन मल्लाप्पा वासकरांनी श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांना वारकरी संप्रदायाची दीक्षा दिली, पाचपोर महाराज यांचे गोरक्षणाचे कार्य अद्वितीय आहे अशा प्रत्येकच महाराज मंडळींच्या कार्याचा आवाका मोठा आहे. यात अक्षय महाराज भोसले व आचार्य तुषार भोसले यांनी अनुक्रमे शिवसेना व भाजप या पक्षाचे आध्यात्मिक आघाडी असे व्यासपीठ निर्माण करुन त्या माध्यमातून वारकरी संप्रदायातील अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत या प्रयत्नांतूनच पंढरपूरसाठी मुख्यमंत्री यांनी एक हजार बेडचे रुग्णालय मंजूर केले आहे. तरीही या आघाडीच्या माध्यमातून कोणीही महाराज मंडळी राजकारणात उतरली नाहीत किंवा संप्रदाय कोणत्याही पक्षाच्या दावणीला बांधलेला नाही हे निर्विवाद सत्य आहे. 

झालेल्या या प्रकारामुळे सर्व सामान्य वारकऱ्यांची अत्यंत संतापाची भुमिका असल्याचे लक्षात घेऊन आजची बैठक घेण्यात आली व यात लवांडे यांनी तात्काळ वारकरी संप्रदायाची माफी मागावी, ज्या पुजनीय संतांना घुसखोर म्हणून अवमानीत करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून क्षमायाचना करावी. हे स्वतः लवांडे करत नसल्यास उद्या दुपारी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करुन लवांडेच्या अटकेची मागणी केली जाणार आहे. वारकरी संप्रदायाच्या तीव्र भावना व कायदा सुव्यवस्थेचा निर्माण होऊ शकणारा प्रश्न लक्षात घेऊन शासनाने व प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन लवांडेना अटक करावी. अन्यथा येत्या आठवड्यात पंढरपूर मध्ये एक भव्य दिव्य दिंडी मोर्चाचे आयोजन करण्यात येईल, गावोगावी अशा तक्रारी मोर्चे होतील, मानहानीचा दावा दाखल होईल. वारकरी संप्रदायाचा विनाकारण दुस्वास करणारांना कायमचा धडा शिकवण्याचा विडा संप्रदायाने उचलला असून शासनाने महाराष्ट्र सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व राष्ट्रवादी पक्ष (श.प.) गटाने आपली आणखी वाताहत होऊ नये यासाठी तात्काळ लवांडेवर कारवाई करावी अन्यथा वारकरी संप्रदायाच्या अद्भूत,अकल्पनीय, अविश्वसनीय रोषाला सामोरे जावे लागेल असा देखील यावेळी इशारा देण्यात आला

या बैठकीत खालील महाराज मंडळी प्रातिनिधिक स्वरुपात उपस्थित होती.

सर्वश्री ह.भ.प.संजय महाराज देहूकर 

डाॅ.महेश महाराज देहूकर (जगद्गुरु तुकाराम महाराज वंशज )विठ्ठल महाराज नामदास ,निवृत्ती महाराज नामदास(संत नामदेव महाराज वंशज)

भागवत महाराज शिरवळकर ,विठ्ठल स्वामी महाराज वडगांवकर, भागवत महाराज चवरे, विठ्ठल महाराज चवरे,रघुनाथ महाराज कबीर 

नागेश महाराज बागडे ,रामकृष्ण महाराज वीर 

शाम महाराज उखळीकर ,विश्वनाथ महाराज राशीनकर ,हरि महाराज लबडे ,श्रीकांत महाराज हरिदास ह्रषीकेश महाराज उत्पात ,रमेश महाराज वाघ, आळंदी , ज्ञानेश्वर महाराज तारे ,योगेश महाराज पिंपळनेरकर ,पद्मनाभ महाराज देवडीकर ,माधव महाराज बडवे , नगरसेवक सौरभ थिटे पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

चौकट: राजकारणी लोकांना आम्ही राजकारण कसे करावे हा सल्ला देत नाही त्यांनी आम्हाला संप्रदाय कसा चालवायचा शिकवू नये. संप्रदाय हिंदू धर्मातील एक सर्वात विकसीत उपासना पंथ आहे. संप्रदायाला निधर्मी ठरवण्याचा प्रयत्न कशाला ? संप्रदायामुळे जातीयभिंती नष्ट होऊन समाज धर्ममार्गाने एकत्र येतो तेव्हा जातीयवादी राजकारण करणाऱ्या पक्षांना याचा मोठा अडसर निर्माण होतो हिच यांची पोटदुखी. मोठ्या पक्षांशी लढण्याची ताकद नाही म्हणून वारकरी संप्रदायाला लक्ष्य केले जात असल्याचे देखील यावेळी महाराज मंडळींकडून सांगण्यात आले.

Post Views: 138
Previous Post

भिगवण रेल्वे स्थानकावर आरोग्य तपासणी शिबिर

Next Post

मध्य रेल्वेच्यावतीने रेल्वे वापरकर्ते सल्लागार समिती’ची बैठक संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
मध्य रेल्वेच्यावतीने रेल्वे वापरकर्ते सल्लागार समिती’ची बैठक संपन्न

मध्य रेल्वेच्यावतीने रेल्वे वापरकर्ते सल्लागार समिती'ची बैठक संपन्न

ताज्या बातम्या

बिहारच्या जमुईत मुलीला त्रास देणाऱ्याचा एनकाउंटर #viral #news

September 22, 2026

संपूर्ण देशात व्यक्त होतोय राग #viral #news

September 22, 2026

शहरात इथे असणार बाप्पांचे विसर्जन कुंड #solapurnews #news #aajsolapur #latestnews

September 22, 2026

नोकरी द्या नाही तर आत्महत्या करतो म्हणत तो थेट चढला महापालिकेच्या इमारतीवर

September 22, 2026

भारतीय संघास १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य #solapurnews #news

September 22, 2026
आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

September 21, 2026
पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

September 21, 2026
सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

September 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1246357

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!