सोलापूर : स्वतःच्या शेतातील शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना कर्नाटक राज्यातील उमदी (सोनगी रोड ) येथे आज सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
रहिमान रमजान मुलाणी (वय 33 वर्षे , रा. गुरप्पा म्हेत्रे वस्ती, कुमठा नाका, सोलापूर) असे त्या मयत तरुणाचे नाव आहे.
मृत रहिमान हा आज सकाळी उमदी येथील स्वतःच्या शेताला गेला होता .तेथे तो पोहण्यासाठी शेततळ्यात गेला असता पाण्यात पडल्याने त्यातच बुडाला. ही घटना सकाळी नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान नातेवाईकांनीइतरांच्या मदतीने बाहेर काढून बेशुध्दावस्थेत येथील शासकीय रुग्णालायत दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
Post Views: 5