
सांगोला – लेह-लडाख येथे फिरायला गेलेल्या सांगोला शहरातील तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि.३ जून रोजी घडली. याबाबत अधिक माहिती अशी, सांगोला शहरातील एखतपुर रोडवरील लिंगे वस्ती येथील पाण्याच्या टाकी जवळील रहिवासी आकाश आण्णासो जाधव (वय-३०) हा तरुण आपल्या मित्रांसोबत लेह-लडाख येथे फिरायला गेला होता. बुधवार दि.३ जून रोजी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास त्याच्या दोन चाकी गाडीचा एका वळणावर अपघात झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील व एक विवाहित बहीण असा परिवार आहे. आकाश जाधव हा एक चांगला क्रिकेट खेळाडू होता. तसेच तो एकुलता एक मुलगा होता. त्याच्या निधनामुळे सांगोला शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Post Views: 6