Wednesday, June 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी : भारतीय पुरुष हॉकी संघाचा मलेशियावर ५-० ने एकतर्फी विजय

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 7, 2023
in india
0
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी : भारतीय पुरुष हॉकी संघाचा मलेशियावर ५-० ने एकतर्फी विजय
0
SHARES
33
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये यजमान भारतीय पुरुष हॉकी संघाने दमदार कामगिरी करत रविवारी मलेशिया विरुद्धच्या एकतर्फी लढतीत ५-० असा विजय मिळवला. भारताने या विजयासह आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडकात सात गुणांसह पहिल्या स्थानावर धडक मारली. मलेशियाचा संघ सहा गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या क्वार्टरपासूनच आघाडी घेत चारही क्वार्टरमध्ये गोल करत भारतीय संघाने आपला दबदबा कायम राखला. या खेळीने मलेशियाची विजयाकडे जाणारी वाटचाल रोखली. भारताच्या या विजयात कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि जुगराज सिंग यांनी चमकदार कामगिरी केली. यासोबतच कार्ती सेल्वम, हार्दिक सिंग, गुर्जंत सिंग यांनी प्रत्येकी एक गोल करीत भारताला दिमाखदार विजय मिळवून देण्यात खारीचा वाटा उचलला. सेल्वमने १५ व्या मिनिटाला फिल्ड गोल करीत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ३२ व्या मिनिटाला हार्दिक सिंगने पेनल्टी कॉर्नरवर दमदार गोल केला. हरमनप्रीतने ४२ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर भारताचा तिसरा गोल केला आणि हाच त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळातील १५० वा गोल ठरला. गुर्जंत सिंगने ५३ व्या मिनिटाला फिल्ड गोल करीत भारताच्या गोलचा चौकार मारला. शेवटी ५४ व्या मिनिटाला जुगराज सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत भारताच्या दणदणीत विजयावर शिक्कामोर्तब केले.

पाकिस्तान-जपान यांच्यामधील लढत बरोबरीत

दरम्यान पाकिस्तान-जपान यांच्यामध्ये झालेली अन्य लढत ३-३ अशी बरोबरीत राहिली. यामुळे या दोन्ही देशांना या स्पर्धेमध्ये अद्याप विजयाचे खाते उघडता आलेले नाही. त्यामुळे पाकिस्तान व जपान या दोन्ही देशांना प्रत्येकी तीन लढतींनंतर दोन गुणांवरच समाधान मानावे लागले आहे. या दोन्ही देशांच्या दोन लढती अनिर्णित राहिल्या असून एका लढतीत त्यांचा संघ पराभूत झाला आहे. पाकिस्तानकडून राणा अब्दुल, मुहम्मद खान यांनी दमदार गोल केले. जपानकडून सेरेन तनाका, आरयोसेई कातो व मसाकी ओहाशी यांनी शानदार गोल केले.

गतविजेत्या दक्षिण कोरियाला रोखण्यात चीनला यश

दक्षिण कोरिया-चीन यांच्यामध्येही लढत पार पडली. या लढतीत गतविजेत्या दक्षिण कोरियाला रोखण्यात चीनला यश मिळाले. चीनने दक्षिण कोरियाला १-१ अशा बरोबरीत रोखले. जांग जोंगह्यून याने १८ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर दक्षिण कोरियासाठी गोल केला. पण चीनच्या चेन चोंगकोंग याने अप्रतिम फिल्ड गोल करून बरोबरी साधली. अखेरच्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही देशांना गोल करता आला नाही. दक्षिण कोरियाने तीन सामन्यांमधून पाच गुणांची कमाई केली असून चीनला तीन सामन्यांमधून फक्त एका गुणाचीच कमाई करता आली.

Post Views: 116
Previous Post

भारतविरोधी अपप्रचाराबाबत न्याय्य भूमिका घ्या, उपराष्ट्रपतींचे नागरिकांना आवाहन

Next Post

गडचिरोली : सुरजागड पहाडावरील अपघातातात तीन ठार….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
गडचिरोली : सुरजागड पहाडावरील अपघातातात तीन ठार….

गडचिरोली : सुरजागड पहाडावरील अपघातातात तीन ठार....

ताज्या बातम्या

डॉ. गायत्रीचे यश समाजासाठी प्रेरणादायी – महेश पंडीत

डॉ. गायत्रीचे यश समाजासाठी प्रेरणादायी – महेश पंडीत

June 17, 2026
पांडुरंगाने दिली सेवेची संधी; वाढती गर्दी गृहीत धरून आषाढी वारीचे हायटेक नियोजन – सीईओ कुशल जैन

पांडुरंगाने दिली सेवेची संधी; वाढती गर्दी गृहीत धरून आषाढी वारीचे हायटेक नियोजन – सीईओ कुशल जैन

June 17, 2026
औषधी वनस्पती उद्यान ठरतेय नवसंजीवनी; रुग्ण, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी ज्ञान, उपचार व संवर्धनाचा प्रभावी दुवा

औषधी वनस्पती उद्यान ठरतेय नवसंजीवनी; रुग्ण, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी ज्ञान, उपचार व संवर्धनाचा प्रभावी दुवा

June 17, 2026
बैलगाडी सफरने उत्कर्ष विद्यालयाचा प्रवेशोत्सव

बैलगाडी सफरने उत्कर्ष विद्यालयाचा प्रवेशोत्सव

June 17, 2026
महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बदली

महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बदली

June 17, 2026

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोघांचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू

June 17, 2026
खाजगी शाळांच्या मनमानीमुळे पालक त्रस्त; शिक्षण विभागाकडे कारवाईची मागणी

खाजगी शाळांच्या मनमानीमुळे पालक त्रस्त; शिक्षण विभागाकडे कारवाईची मागणी

June 17, 2026
कन्हेरगावच्या वाड्या-वस्तीवरील सिंगल फेज वीजपुरवठ्यासाठीचे आमरण उपोषण यशस्वी

कन्हेरगावच्या वाड्या-वस्तीवरील सिंगल फेज वीजपुरवठ्यासाठीचे आमरण उपोषण यशस्वी

June 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

byतरुण भारत
June 14, 2026
0

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0915137

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697