Sunday, June 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

हायड्रोजन आपल्या वसुंधरेसाठी शाश्वत आणि समृद्ध भविष्याचा आधारस्तंभ बनेल : आर के सिंह

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
October 9, 2023
in india
0
हायड्रोजन आपल्या वसुंधरेसाठी शाश्वत आणि समृद्ध भविष्याचा आधारस्तंभ बनेल : आर के सिंह
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हायड्रोजन हा पर्यावरणातील सर्वांत मुबलक घटक आहे. त्यात आपल्या उर्जेच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याची, हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी करण्याची आणि स्वच्छ उर्जेने आपल्या अर्थव्यवस्थांना सामर्थ्यवान करण्याची क्षमता आहे. त्यामुळे हायड्रोजन आपल्या वसुंधरेसाठी शाश्वत आणि समृद्ध भविष्याचा आधारस्तंभ बनेल, हे आपण एकत्रितरित्या सुनिश्चित करु शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह यांनी केले.

दरवर्षी 8 ऑक्टोबर रोजी जागतिक हायड्रोजन आणि इंधन सेल दिन साजरा केला जातो. त्या अनुषंगाने हरित आणि शाश्वत ऊर्जेचा स्रोत म्हणून हायड्रोजन वापराच्या असीम शक्यतांचा शोध घेण्यासाठी आणि त्याचा लाभ घेण्यासाठी भारत सरकारने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने, सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या सहकार्याने नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात उद्योग, शिक्षण आणि सरकारमधील हायड्रोजन तज्ञ एकत्र आले होते. त्यात एका व्हिडिओ संदेशाद्वारे त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

ते पुढे म्हणाले की, या जागतिक हायड्रोजन दिनानिमित्त आपण हायड्रोजन पर्यायाचे संशोधन, विकास आणि उपयोजनाबाबतच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करूया. आपण आपल्या उद्योगांना आणि समुदायांना ऊर्जा संक्रमणातील एक प्रमुख घटक म्हणून हायड्रोजनचा स्वीकार करण्यासाठी प्रेरित करूया.

या प्रसंगी, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनसाठी संशोधन आणि विकास आराखड्याचे अनावरण केले. 400 कोटी रुपये अर्थसंकल्पाची तरतूद असलेला हा आराखडा संशोधन आणि विकास परिसंस्था विकसित करण्यासाठी मार्गदर्शन प्रदान करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे हा आराखडा हरित हायड्रोजनचे व्यावसायीकरण करण्यात मदत करू शकेल आणि सोबतच भारताच्या महत्त्वाकांक्षी हवामान आणि ऊर्जा उद्दिष्टांमध्ये योगदान देऊ शकेल. हा आराखडा हरित हायड्रोजन उत्पादन, साठवण आणि वाहतुकीची कार्यक्षमता, विश्वासार्हता आणि किफायतशीरपणा सुधारण्यासाठी नवीन साहित्य, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करतो. हा संशोधन आणि विकास कार्यक्रम सुरक्षेला प्राधान्य देईल आणि हायड्रोजन अर्थव्यवस्था विकसित करण्याच्या मार्गातील तांत्रिक अडथळे आणि आव्हाने दूर करेल.

आराखड्याच्या पहिल्या टप्प्याचे ध्येय हे 2-3 वर्षात परिणाम दाखवू शकणाऱ्या मिशन मोड प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करणे हेच आहे, असे प्रख्यात शास्त्रज्ञ आणि भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार, प्राध्यापक अजय कुमार सूद यांनी आपल्या मुख्य भाषणात संशोधन आणि विकास आराखड्याबाबत बोलताना सांगितले.

या कार्यक्रमात संशोधन आणि विकास आराखड्या व्यतिरिक्त भारत सरकारच्या राष्ट्रीय एक खिडकी प्रणाली (NSWS) वरील हरित हायड्रोजन पृष्ठाचे अनावरण देखील करण्यात आले. हे पृष्ठ राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत प्रकल्पांशी संबंधित सर्व मंजूरी मिळविण्यासाठी उद्योगांना एकल खिडकी सुविधा प्रदान करेल.

जागतिक हायड्रोजन आणि इंधन सेल दिवस हा एक जागतिक उपक्रम आहे. ज्याचा उद्देश इंधन सेलच्या बहुमुखी तंत्रज्ञानासह हायड्रोजन हा स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा स्त्रोत म्हणून याबाबत जागरूकता आणि समजूत वाढवणे हा आहे. हा दिवस हवामान बदल, ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरणीय शाश्वतता या महत्त्वाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी हायड्रोजन आणि इंधन सेलची क्षमता ओळखण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करतो.

Post Views: 119
Previous Post

३ नोव्हेंबरला येतायत ‘रंगीले फंटर’ !

Next Post

सिक्कीम स्थितीबाबत केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा आणि मुख्यमंत्री तमांग यांची उच्चस्तरीय बैठक

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सिक्कीम स्थितीबाबत केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा आणि मुख्यमंत्री तमांग यांची उच्चस्तरीय बैठक

सिक्कीम स्थितीबाबत केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा आणि मुख्यमंत्री तमांग यांची उच्चस्तरीय बैठक

ताज्या बातम्या

भारतीय हवाई दलाचे विमान क्रॅश

June 14, 2026

हे पहा अधिक मासातील विलोभनीय रूप #viral #marathinews

June 14, 2026

गोरे म्हणाले नेते मोठे आहेत #viral #marathinews #solapurnews

June 14, 2026

१०.४६ लाखांच्या भेसळयुक्त खतप्रकरणी गुन्हा

June 13, 2026

दोन कारची समोरासमोर धडक ; एकाचा जागीच मृत्यू तर पाच जण किरकोळ जखमी

June 13, 2026
म्हशीच्या दुधात जर्शी गायीचे दुध भेसळ करण्याचे प्रमाण वाढले

म्हशीच्या दुधात जर्शी गायीचे दुध भेसळ करण्याचे प्रमाण वाढले

June 13, 2026
“इंग्रजांविरुद्ध आमचा बाप लढला; आमच्या नशिबी मात्र गुन्हेगारीचा कलंक लागला” – डॉ. अरुण जाधव

“इंग्रजांविरुद्ध आमचा बाप लढला; आमच्या नशिबी मात्र गुन्हेगारीचा कलंक लागला” – डॉ. अरुण जाधव

June 13, 2026

भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील २ तोळे सोन्याचे गंठण लंपास

June 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0909120

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697