सोलापूर : दि. १८/१०/२०२६ रोजी पद्मशाली शिक्षण संस्थेची ११४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज बोलाविण्यात आली होती. सभेची सुरुवात श्री मार्कंडेय महामुनींच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ सभासद सत्नारायण पसनूर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सभा सकाळी १० वाजता सुरू झाली.
सभेच्या अगोदर अहवाल सालात ज्या सभासदांचे दुःखद निधन झाले अशा सर्व सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर संस्थेचे विश्वस्त व्यंकटेश आकोन यांनी प्रस्तावना करून उपस्थित सर्व सभासदांचे स्वागत केले.
सभेत मागील सभेचे वृत्तांत वाचून काढण्यात आले व सभासदांनी विषय क्रं. १ ला सर्वानुमते मंजुरी दिली. तसेच सुरेश श्रीराम, आनंद चिन्नी, राजाराम गोसकी, सुदर्शन बोल्लम व सुदर्शन संदुपटला या आजीव सभासदांनी विविध विषयावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर चर्चा मसल्लत होऊन अगदी खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडली. सभेतील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.
सभेच्या शेवटी सुरेश श्रीराम, राजाराम गोसकी, आनंद चिन्नी यांनी वार्षिक सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात व अहवालातील उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल व संस्थेचे सचिव दशरथ गोप यांना झ्रीम फाउंडेशन वतीने आयकॉन ऑफ महाराष्ट्र अवार्ड २०२६ पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी व विश्वस्त यांचे अभिनंदन केले.
केले.
यावेळी वार्षिक सर्वसाधारण सभेस संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष अँड. श्रीनिवास व्यातम, उपाध्यक्ष प्रा. श्रीनिवास कोंडी, सचिव दशरथ गोप, सहसचिव मल्लिकार्जुन सरगम, खजिनदार गोवर्धन कमटम, विश्वस्त दिनेश यन्नम, नागनाथ गंगी, श्रीधर चिट्याल, व्यंकटेश आकोन, मधुकर कट्टा, विजयकुमार गुल्लापल्ली, गणेश गुज्जा, हरिप कोंडा, प्रभाकर आराकाल, नागनाथ श्रीरामदास, श्रीनिवास जोग, नरेश श्रीराम, दत्तात्रय यन्नम, रामदास इप्पाकायल, श्रीनिवास गडुम, अंबादास गज्जम, श्रीनिवास इप्पाकायल व सभासद गण आदी उपस्थित होते.