Tuesday, September 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

एकता महिला मंचचा स्तुत्य उपक्रम: बार्शी शहर पोलीस ठाण्यात रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात संपन्न

तरुण भारतbyतरुण भारत
August 27, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

 

​वैराग – नागरिकांच्या रक्षणासाठी २४ तास तत्पर असणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपासण्यासाठी ‘एकता महिला मंच’च्या वतीने बार्शी शहर पोलीस ठाणे येथे रक्षाबंधन सणाचा विशेष व स्नेहपूर्ण उपक्रम अतिशय जल्लोषात आणि कौटुंबिक वातावरणात साजरा करण्यात आला. आज दिनांक २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता पार पडलेल्या या कार्यक्रमात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून महिला भगिनींनी आपले बंधुप्रेम व्यक्त केले.
​कार्यक्रमास बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप झाल्टे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील धनवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक अभय माकणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच एकता मंचचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर क्षीरसागर, पोलीस कॉन्स्टेबल कादर तांबोळी, पोलीस कॉन्स्टेबल अजित वरपे, पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग मुंडे, पोलीस कॉन्स्टेबल रियाज शेख आणि सागर सुरवसे यांच्यासह बार्शी शहर पोलीस स्टेशनमधील सर्व पोलीस कर्मचारी, होमगार्ड महिला भगिनी व होमगार्ड बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बार्शी शहर पोलीस ठाण्यामधील सर्वच एकूण पोलीस बांधवांना एकता महिला मंचच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी राखी बांधून एक नवा आदर्श निर्माण केला.
​या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना एकता महिला मंचचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर क्षीरसागर म्हणाले, “रक्षाबंधन निमित्त पोलीस बांधवांना गेले चार-पाच वर्षांपासून एकता महिला मंचच्या माध्यमातून हे सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. सणासुदीच्या काळात घरापासून लांब राहून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांना या काळात घरी जाणे शक्य नसते. त्यांना आपल्या सख्ख्या बहिणीची उणीव भासू नये, या अत्यंत उदात्त हेतूने हा उपक्रम आयोजित केला जातो.”
​तसेच एकता महिला मंचच्या रंजना गवळी यांनी आपल्या भाषणात एकता महिला मंच या व्यासपीठाची उद्दिष्टे, सामाजिक भूमिका आणि या स्तुत्य उपक्रमाची सविस्तर पार्श्वभूमी सांगत मंचाच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन गीतांजली जोशी यांनी केले, प्रास्ताविक कविता दसवंत यांनी मांडले, तर उपस्थितांचे आभार लक्ष्मी सुतार यांनी मानले.
​पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांची प्रतिक्रिया:
​”एकता महिला मंचचा हा राखी बांधण्याचा उपक्रम खरोखरच अत्यंत स्तुत्य आणि वाखाणण्याजोगा आहे. सणासुदीच्या काळात कर्तव्यावर असल्यामुळे आम्हाला आमच्या घरी जाणे शक्य होत नाही. आम्ही सर्वजण खूप बाहेरगावावरून येथे सेवा बजावण्यासाठी आलेलो असतो. अशा वेळी एकता महिला मंचने प्रत्यक्ष येथे येऊन, राखी बांधून आमच्यावर जे निरपेक्ष प्रेम दाखवले आहे, त्या प्रेमाबद्दल त्या खरंच मनापासून कौतुकास पात्र आहेत. एकता महिला मंचचे हे कार्य अतिशय मोलाचे असून मी त्यांच्या पुढील सर्व सामाजिक वाटचालीसाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा देतो.”
​(यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांनी समाजव्यवस्थेतील महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसेच महिलांवर होणारे अत्याचार व अन्याय निवारण या सर्व महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.)
​पोलीस बांधवांनी मानले आभार; दिले ‘वृक्ष भेट’चे अनोखे रिटर्न गिफ्ट!
​या प्रसंगी राखी बांधून झाल्यानंतर भावुक झालेल्या पोलीस अधिकारी व पोलीस बांधवांनी एकता महिला मंचच्या सदस्यांचे मनापासून आभार मानले. “एकता महिला मंचच्या सदस्यांनी आम्हाला राखी बांधून आजचा आमचा हा दिवस अत्यंत आनंदाचा आणि स्मरणीय बनवला, त्याबद्दल आम्ही त्यांचे सदैव ऋणी आहोत,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
​त्याचप्रमाणे या रक्षाबंधनाचे औचित्य साधून बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने एक अत्यंत अनोखी व सामाजिक संदेश देणारी पद्धत राबवण्यात आली. प्रत्येक महिला सदस्याला राखी बांधून झाल्यानंतर प्रत्यक्ष वृक्षारोपण करण्यासाठी एक-एक झाड भेट म्हणून देण्यात आले. “हीच आमची तुम्हाला रक्षाबंधनची खरी आणि अनमोल भेट आहे. या झाडाचे योग्य संगोपन करा, ते जतन करा आणि वाढवा, हीच आमची तुमच्याकडून भेट असेल,” असे सांगत पोलीस बांधवांनी सर्व महिलांना वृक्षभेट देऊन पर्यावरण रक्षणाचा एक नवा संदेश दिला.
​उपस्थित पदाधिकारी व सदस्या:
या कार्यक्रमासाठी एकता महिला मंचच्या प्रमुख व जिल्हाप्रमुख लक्ष्मी सुतार, जिल्हा प्रवक्त्या रंजना गवळी, तालुकाप्रमुख कविता दसवंत, तालुका प्रसिद्धी प्रमुख गीतांजली जोशी, तसेच आशा विभूते, वसुधा कुंभार, स्नेहल तळेकर, उषा ठाकूर, सरिता कुलकर्णी, स्वाती सुतार, मनीषा गवळी, संगीता कदम, वर्षा साळुंखे, पूजा काळे, राजश्री बादगुडे, मथुरा दसवंत, मैना सोनवणे, मनीषा गवळी, सविता दसवंत, सुकनंदा सुरवसे, सुरेखा कोळी, पंचशीला बनसोडे, वैशाली साळुंखे इत्यादी सर्व पदाधिकारी, सदस्या व इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Post Views: 39
Previous Post

150 क्रीडा शिक्षकांना आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार ने सन्मानित

Next Post

वखारिया विद्यालयाने सैनिकांना पाठवल्या राख्या

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
वखारिया विद्यालयाने सैनिकांना पाठवल्या राख्या

वखारिया विद्यालयाने सैनिकांना पाठवल्या राख्या

ताज्या बातम्या

शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा व्याख्यानमाला उत्साहात संपन्न

शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा व्याख्यानमाला उत्साहात संपन्न

September 8, 2026
शौर्य, इलिशा, आर्या, अयान, आर्य, साईशा व आर्यन ठरले विजेते

शौर्य, इलिशा, आर्या, अयान, आर्य, साईशा व आर्यन ठरले विजेते

September 8, 2026

पावसाची ओढ, खरीप धोक्यात !

September 8, 2026

निधीवाटपाचा ६०:४० फॉर्म्युला चर्चेत; सत्ताधाऱ्यांना झुकते माप?

September 8, 2026
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात अँड वैभव मेथवडे यांचे बाल लैंगिक अत्याचार याविषयी मार्गदर्शन

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात अँड वैभव मेथवडे यांचे बाल लैंगिक अत्याचार याविषयी मार्गदर्शन

September 8, 2026
साहित्य सेवा संघाचा ‘उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ डॉ. शंकर नवले यांना प्रदान

साहित्य सेवा संघाचा ‘उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ डॉ. शंकर नवले यांना प्रदान

September 8, 2026
‘जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाची गरज’ 

‘जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाची गरज’ 

September 8, 2026

वारंवारच्या ‘इमर्जन्सी लोडशेडिंग’ संदेशांमुळे मंगळवेढ्यात नागरिक त्रस्त

September 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1178918

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!