अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये 80 वा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात आणि देशभक्ती पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून चार्टर्ड अकाऊंटंट व हिराचंद नेमचंद महाविद्यालयातील स. प्राध्यापक सुनील गोविंद इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सेवानिवृत्त लष्करी जवान सहदेव जगताप तसेच एस.एस.सी. बोर्ड परीक्षा 2026 मध्ये शाळेत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावलेले कु. समृद्धी जंजिराल व कु. तनुश्री भीमनाथ यांनाही प्रमुख अतिथींचा मान देण्यात आला होता .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ. अजय पोन्नम उपस्थित होते .प्रमुख अतिथींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी राष्ट्रगीत गायले. सौ. अश्विनी देशमुख यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अध्यक्षांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध कवायत संचलना नंतर प्राथमिक व माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर करून सर्वांच्या टाळ्या मिळविल्या.यानंतर विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. भरतनाट्यम व ॲबॅकस परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना अतिथींच्या हस्ते प्रशस्तीपत्रके देण्यात आली. प्रमुख अतिथींनी आपल्या भाषणात स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाने अतिशय कठीण परिस्थितीमध्ये, खडतर प्रयत्नाने मिळालेले हे स्वातंत्र्य टिकवण्याची जबाबदारी आज आपल्या खांद्यावरती आहे असे बहुमूल्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले .चि. रामकृष्ण पोन्नम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मंचावर संचालिका सौ. सुलक्षणा पोन्नम, चि. रामकृष्ण पोन्नम, उपमुख्याध्यापिका तस्नीम शेख, पर्यवेक्षिका अर्चना महांकाळ,सौ. ज्योती आडम, चन्नेश इंडी सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फौजान अझहरी यांनी केले तर आभार प्रदर्शन रासेश्वरी गड्डम यांनी केले .शेवटी वंदे मारतम व खाऊ वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Post Views: 7