Wednesday, May 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बिहार : रेल्वे अपघातात घातपाताचा संशय

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
October 12, 2023
in railway, india
0
बिहार : रेल्वे अपघातात घातपाताचा संशय
0
SHARES
60
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बिहारच्या बक्सर येथे बुधवारी झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 6 जण ठार झाले असून सुमारे 100 जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी रेल्वे रूळ जागोजागी तुटल्याचे आढळून आले. त्यामुळे या अपघातामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त होतोय. दरम्यान या घटनेची रेल्वे बोर्डाने उच्च स्तरीय चौकशी सुरू केली आहे. यासंदर्भातील तपास पूर्ण झाल्यावर अपघाताचे खरे कारण पुढे येण्यास मदत मिळेल असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

याबाबत सीपीआरओ वीरेंद्र कुमार यांनी सांगितले की, रेल्वे बोर्डाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. रेल्वे प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि स्थानिक लोक घटनास्थळी मदतकार्यात गुंतले आहेत. अपघाताच्या कारणाबाबत काहीही सांगणे घाईचे आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. घटनास्थळी झोन आणि रेल्वे विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी तळ ठोकून आहेत. सध्या संपूर्ण लक्ष मदत आणि बचाव कार्यावर आहे. रेल्वेचे डबे बाजूला करण्यासाठी आणि या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी वेगाने काम सुरू आहे. जखमींवर येथील जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेस बक्सरहून सुटल्यानंतर 9 मिनिटांनी ती रुळांवर घसरली. हा अपघात झाला तेव्हा गाडीचा वेग हा ताशी 120 किमी होता. यामुळेच अपघातानंतर रेल्वेचे एक-दोन कोच वगळता जवळपास सर्व डबे अप मार्गावरील रुळांवरून घसरून पडले. सुदैवाने त्यावेळी अप मार्गावरून एकही गाडी जाण्याची वेळ नव्हती, अन्यथा बालासोरसारखी दुर्घटना घडली असती. याप्रकरणी गार्ड आणि चालकाने सतर्कता दाखवत रेल्वे कंट्रोलरूमला रेल्वे अपघाताची माहिती दिली. यानंतर अप आणि डाऊन मार्गावरील गाड्यांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. तपासणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना लांब अंतरावर रेल्वे रुळ तुटल्याचे दिसून आले. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती विचारली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.

Post Views: 138
Previous Post

भारत वि. पाकिस्तान सामन्यासाठी पश्चिम रेल्वेकडून विशेष गाड्या

Next Post

अखेर ठरलं! ठाकरे गटाला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
अखेर ठरलं! ठाकरे गटाला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी

अखेर ठरलं! ठाकरे गटाला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी

ताज्या बातम्या

कार अपघात माय लेक जागीच ठार #viral #solapurnews #aajsolapur

May 26, 2026

प्रणिती शिंदे आता खासदार मॅच्युरिटीने बोलतील असे वाटते मुख्यमंत्री फडणवीस #viral #maharashtranews

May 26, 2026

सांगोल्यात जनगणनेदरम्यान शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू #marathinews

May 26, 2026

इंधनदरवाढी विरोध आणि कांद्याचे घसरलेले दर यासाठी केले आंदोलन #viral #maharashtranews

May 26, 2026

या कारणाने केली त्याने रस्त्यात पत्नीची हत्या #viral #maharashtranews

May 26, 2026

मनपा स्थायी समिती सभापती रंजिता चाकोतेनी सिद्धेश्वर तलावातील माशांवर काढणार तोडगा #solapurnews

May 26, 2026

कौटुंबिक वादातून चार चिमुकल्यांना विहिरीत फेकून पित्याची आत्महत्या

May 26, 2026

आंबेनळी घाटात १ हजार फूट खोल दरीत मोटार कोसळली ; ८ तरुण ठार #marathinews #viral

May 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0880849

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697