Wednesday, June 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अजित पवार यांची सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उघडपणे प्रचाराला सुरूवात, कार्यकर्ते मतदारांना तंबी देत म्हणाले…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 4, 2024
in maharashtra
0
अजित पवार यांची सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उघडपणे प्रचाराला सुरूवात, कार्यकर्ते मतदारांना तंबी देत म्हणाले…
0
SHARES
53
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येत्या लोकसभेत आपल्याला महायुती देईल, त्याच उमेदवाराचं काम करायचं आहे असे सांगताना भावनिक न होता सुप्रिया सुळे यांच्याविरोधातच काम करायचं आहे, असे अप्रत्यक्षपणे सांगून अजित पवार यांनी लोकसभेच्या प्रचाराचा नारळच फोडला.

 

 

बारामती लोकसभा निवडणुकीसाठी महायुती लवकरच आपला उमेदवार जाहीर करेन. मी उमेदवार आहे असं समजून मला मतदान केलं पाहिजे, अशी तंबी कार्यकर्ते आणि मतदारांना देतानाच, काही लोक भावनिक होतील, माझी शेवटची निवडणूक आहे असं सांगतील, पण खरंच ती शेवटची निवडणूक असेल का? असा सवाल उपस्थित करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. तसेच निवडणूक जाहीर होण्याआधीच त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधातील आगामी काळातील आपले इरादे स्पष्ट केले. आतापर्यंत एकमेकांच्या कामाचं महत्त्व सांगत, एकमेकांच्या कामाची स्टाईल सांगत ताई-दादा मतं मागायचे. परंतु यावेळी राष्ट्रवादीतील फुटीमुळे पवार कुटुंबात मोठा संघर्ष होणार असल्याची चिन्हे आहेत.

 

 

बारामती शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने संभ्रमात असलेल्या बारामतीमधील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना अजित पवार यांनी भावनिक न होता व्यावहारिक राहण्याचा सल्ला देता. तसेच येत्या लोकसभेत आपल्याला महायुती देईल, त्याच उमेदवाराचं काम करायचं आहे असे सांगताना भावनिक न होता सुप्रिया सुळे यांच्याविरोधातच काम करायचं आहे, असे अप्रत्यक्षपणे सांगून लोकसभेच्या प्रचाराचा नारळच फोडला.

 

 

 

अजित पवार काय म्हणाले?

जर माझ्या विचारांचा खासदार झाला तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना मी सांगू शकेन की, मोदीसाहेब माझ्या लोकांनी याला खासदार म्हणून निवडून दिले आहे. मी म्हणजे माझ्या, बारामतीकरांनी, इंदापूरकरांनी, माझ्या दौंडकरांनी, भोर, वेल्हा, मुळशीकरांनी संबंधित उमेदवारांना निवडून दिलेलं आहे. त्यामुळे माझ्या बारामतीकरांची कामं करायला हवीत, असं मी त्यांना हक्काने सांगू शकेन. आतापर्यंत आपल्या आजूबाजूला किती तरी आमदार आणि खासदार होऊन गेले. पण आपल्या अडचणींना कोण आपल्याला उपयोगी पडतंय याचाही विचार करा, अजून खूप विकास कामं आपल्याला आपल्या करायची आहेत, असं अजित पवार म्हणाले.

 

गंभीर समस्येतून आपण जात आहोत. एकीकडे अजित सांगतो असं करा, दुसरीकडे वरिष्ठ सांगतो तसं करा. कुणाचं ऐकायचं असा प्रश्न तुमच्या समोर आहे. पण कार्यकर्त्यांनो भावनिक न होता तुम्ही व्यावहारिक राहा. तुम्ही मला निवडणुकीत योग्य पद्धतीनं सहकार्य केलं (मतदान केलं) तर पुढची कामं होतील. नाही तर तुमची कामं करायला मी बांधील नाही, असा इशाराच अजित पवार यांनी दिला. एवढंच बोलून ते थांबले नाहीत तर महाराष्ट्राला मी स्पष्टवक्ता नेता म्हणून माहिती आहे, असं नेहमीचं पालुपदही त्यांनी ऐकवून दाखवलं.

Post Views: 78
Previous Post

सुनेत्रा वहिनींना उमेदवारी द्या! कार्यकर्त्याची मागणी; अजितदादांच्या उत्तरानं हशा पिकला

Next Post

बजेटमधून आरक्षण मागतोय, लेकाला अध्यादेश कळत नाही; भुजबळांची जरांगेंवर टीका

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
बजेटमधून आरक्षण मागतोय, लेकाला अध्यादेश कळत नाही; भुजबळांची जरांगेंवर टीका

बजेटमधून आरक्षण मागतोय, लेकाला अध्यादेश कळत नाही; भुजबळांची जरांगेंवर टीका

ताज्या बातम्या

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

June 17, 2026

साखर पेठ हुमा किलिनिक येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

June 17, 2026
ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवे बळ; सोलापूर जिल्ह्यात ४,७४१ आरोग्य कर्मचाऱ्यांचे व्यापक प्रशिक्षण सुरू

ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवे बळ; सोलापूर जिल्ह्यात ४,७४१ आरोग्य कर्मचाऱ्यांचे व्यापक प्रशिक्षण सुरू

June 17, 2026
ज्येष्ठांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य विभागाची विशेष मोहीम

ज्येष्ठांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य विभागाची विशेष मोहीम

June 17, 2026
अनुष्काची जागतिक ऑनलाइन भरतनाट्यम् स्पर्धेत निवड

अनुष्काची जागतिक ऑनलाइन भरतनाट्यम् स्पर्धेत निवड

June 17, 2026
वखारिया विद्यालयात विद्यार्थांचा प्रवेशोस्तव उत्साहात साजरा 

वखारिया विद्यालयात विद्यार्थांचा प्रवेशोस्तव उत्साहात साजरा 

June 17, 2026
अतिरिक्त शिक्षकांचे कायमस्वरुपी समायोजन करा

अतिरिक्त शिक्षकांचे कायमस्वरुपी समायोजन करा

June 17, 2026
जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे

जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे

June 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

byतरुण भारत
June 14, 2026
0

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0914376

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697