Saturday, May 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

इंदिरा गांधींनी श्रीलंकेला गिफ्ट केले काचाथीवू बेट

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
March 31, 2024
in india
0
इंदिरा गांधींनी श्रीलंकेला गिफ्ट केले काचाथीवू बेट
0
SHARES
83
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भारत आणि श्रीलंकेदरम्यानचे काचाथीवू बेट तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1974 मध्ये श्रीलंकेला हस्तांतरित केल्याची धक्कादायक माहिती पुढे आलीय. हिंद महासागरातील सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे बेट एका करांतर्गत श्रीलंकेला देण्यात आले. सध्या या बेटावर श्रीलंकेचे अधिपत्य असून तिथे एक चर्च उभारण्यात आलेय. तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी आरटीआय अंतर्गत मिळवलेल्या कागदपत्रातून ही माहिती उघड झालीय.

हिंद महासागरातील कचाथीवू बेट भारताच्या दक्षिणेच्या टोकाला आणि श्रीलंकेच्या मध्यभागी स्थित आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे या बेटावर कोणीही राहत नसले तरी, समारीक दृष्ट्या हे बेट महत्वाचे आहे. मात्र, सध्या त्यावर संपूर्ण नियंत्रण श्रीलंकेचे आहे. या बेटावर एक चर्च असून हे बेट मच्छिमारांसाठी अतिशय उपयुक्त आहे. महिती अधिकारांतर्गत प्राप्त कागदपत्रांनुसार, हे बेट भारतापासून 20 किलोमीटर अंतरावर असून 1.9 चौरस किलोमीटर वर्गात पसरले आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर, श्रीलंका म्हणजेच नंतर सिलोनने या बेटावर दावा केला होता. सिलोन नौदलाने 1955 मध्ये या बेटावर युद्धाभ्यास केला होता. त्यानंतर भारतीय नौदलाने देखील या ठिकाणी युद्धाभ्यास केला. मात्र, यावर श्रीलंकाने आक्षेप घेतला. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी एकदा संसदेत म्हटले होते की, या बेटाचा मुद्दा संसदेत पुन्हा चर्चिला यावा अशी माझी इच्छा नाही. त्यामुळे आम्ही त्यावरचा दावा सोडण्यास देखील मागेपुढे पाहणार नाही. तत्कालीन राष्ट्रकुल सचिव वायडी गुंदेविया यांनी या संदर्भात एक अहवाल तयार केला होता. हा अहवाल 1968 मध्ये सल्लागार समितीने पार्श्वभूमी म्हणून वापरला होता.

काचाथीवू बेट 17 व्या शतकापर्यंत मदुराईचा राजा रामनाद यांच्या अधिपत्याखाली होते. त्यानंतर ब्रिटिश राजवटीत ते मद्रास प्रेसिडेन्सी अंतर्गत भारताकडे आले. या बेटाचा वापर मच्छिमार करत होते. या बेटावरून नेहमीच दोन्ही देशात तणावाचे वातावरण होते. यानंतर 1974 मध्ये दोन्ही देशांमध्ये बैठका झाल्या. पहिली बैठक कोलंबोमध्ये तर दुसरी नवी दिल्लीत झाली. यानंतर इंदिरा गांधींनी श्रीलंकेला हे बेट श्रीलंकेला भेट दिले. या बैठका झाल्या तेव्हा भारताने काचाथीवू बेटावरील आपल्या हक्काबाबत अनेक पुरावेही सादर केले होते. यात राजा नमनदच्या अधिकारांचाही उल्लेख होता. तर श्रीलंकेला असा कोणताही दावा मांडता आला नाही. असे असतानाही श्रीलंकेचा दावाही भक्कम असल्याचे परराष्ट्र सचिवांनी सांगितले. हे बेट जाफनापट्टणमचा भाग असल्याचे दिसून येते. सर्वे ऑफ इंडियाने देखील हे मान्य केले आहे की मद्रासने रामनादच्या राजाची मूळ पदवी असल्याचे सांगितलेले नाही. मच्छिमारांना जाळी सुकविण्यासाठी बेटाचा वापर करता यावा म्हणून बेट ताब्यात देण्याचा करार करण्यात आला. याशिवाय भारतीयांना या बेटावरील चर्चला व्हिसाशिवाय भेट देता येऊ शकते. या संदर्भातील करारावर 1976 मध्ये स्वाक्षरी करण्यात आल्या. दरम्यान, भारतीय मच्छिमार मासेमारी जहाजांसह श्रीलंकेच्या विशेष आर्थिक क्षेत्रात प्रवेश करू शकत नाहीत, असा दावा श्रीलंकेने केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.

काचाथीवू बेट श्रीलंकेला सुपूर्द करतानाही तत्कालीन मुख्यमंत्री करुणानिधी यांनी विरोध केला होता. तसेच हे बेट भारतात विलीन करण्याचा प्रस्तावही 1991 मध्ये तामिळनाडू विधानसभेत मंजूर करण्यात आला होता. यानंतर 2008 मध्ये जयललिता यांनी सुप्रीम कोर्टात सांगितले की, भारत सरकारने घटनादुरुस्ती न करता त्यांचे बेट इतर कोणत्याही देशाला कसे दिले. जयललिता यांनी 2011 मध्ये विधानसभेत ठरावही मंजूर केला. मात्र, 2014 मध्ये ॲटर्नी जनरल मुकुल रोहतगी म्हणाले की, हे बेट श्रीलंकेला देण्यात आले असून ते घ्यावेच लागले तर युद्ध करण्याशिवाय पर्याय नाही.

Post Views: 71
Previous Post

खासदार काय असतो हे आता सोलापूरकरांना दाखवतो ! राम सातपुते यांना मंगळवेढ्यात प्रतिसाद

Next Post

अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीत मतदार माहिती चिठ्ठी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीत मतदार माहिती चिठ्ठी

अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीत मतदार माहिती चिठ्ठी

ताज्या बातम्या

आरोपीला घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनचा अपघात #solapurnews #marathinews #viral

May 30, 2026

रेल्वेच्या वेळापत्रकात होणार बदल #solapurnews #news

May 30, 2026

नालेसफाई महागात नगरअभियंताची वेतनवाढ रोखली झोन अधिकारी निलंबित #solapurnews #viral

May 30, 2026

जरांगे पाटलांच्या उपोषणावर बोलले मुख्यमंत्री #marathinews #news

May 30, 2026

परत हुतात्मा एक्सप्रेस सहा तास पुण्यातच स्टेशनवर रखडली प्रवाशांची गैरसोय #solapurnews #news

May 30, 2026

*सावधान विचलित करणारे दृष्य *जुन्या वादातून सहा जणांचा खून

May 30, 2026

पुण्यात जनगणना करताना शिपाई महिलेला बेदम मारहाण #viral #news #marathinews

May 30, 2026
“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

May 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0886552

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697