महीला सशक्तिकरण महाराष्ट्र शासनाचे धोरण- मोहन अग्रवाल
महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा मोहन अग्रवाल
परतुर /(प्रतिनिधी)
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व महाराष्ट्र शासन राबित असलेल्या विविध योजनांची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत हॉटेल अतिथी परतूर येथे दिली पुढे बोलताना म्हणाले की
‘लाडकी बहीण’ योजने साठी आता तहसील कार्यालयात जायची गरज नाही
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.महाराष्ट्रात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देणार आहे. या योजनेसाठी पात्र महिलांना कागदपत्रांच्या काही अटी ठेवण्यात आल्या होत्या. पण कागदपत्रे बनवण्यासाठी राज्यभरात तहसील कार्यालयांवरील गर्दी पाहता राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्य सरकारने लाभार्थी महिलांसाठी कागदपत्रांमध्ये शिथिलता दिली आहे.
ज्या महिलांकडे डोमिसाइल म्हणजे अधिवासी दाखला नाही त्या महिलेकडे 15 वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला यापैकी एकही कागदपत्र राहिलं तरी त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच या योजनेसाठी राज्य सरकारने 15 जुलै ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख दिली होती. पण राज्य सरकारने ही मुदत दोन महिन्यांनी वाढवली आहे. याचाच अर्थ आता राज्यातील महिला या योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करु शकणार आहेत. राज्य सरकारने केलेल्या या घोषणेमुळे आता महिलांना तहसील कार्यालयात जायची गरज नाही हे स्पष्ट झालं आहे.
आज झालेल्या हॉटेल अतिथी मध्ये पत्रकार परिषदेमध्ये शासनाच्या विविध योजनेची माहिती पत्रकाराला देऊन लोकांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचा आव्हान शेवटी अग्रवाल यांनी केले तसेच शिवसेना सदस्य नोंदणीचा शुभारंभ सुद्धा करण्यात आला शासनाच्या माध्यमातून परतुर विधानसभा मतदारसंघांमध्ये केलेल्या कामाची आढावा तसेच संघटनात्मक बांधणीची माहिती व आगामी काळामध्ये पक्षाचे बांधणीच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली या पत्रकार परिषदेत माजी सभापती प्रल्हादराव बोराडे तालुकाप्रमुख अमोल सुरूंग उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब चिखले ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष शिवाजी तरवटे विधानसभा प्रमुख विजयकुमार गिरी शहर प्रमुख दीपक हिवाळे युवासेना तालुकाप्रमुख अविनाश कापसे शिवसेना उप तालुका प्रमुख नितीन राठोड कैलास चव्हाण युवासेना शहरप्रमुख मोर प्रणय कैलाश पुरी वैद्यकीय चे अशोक टेकाळे आशीर्वाद मोर कृष्णा अग्रवाल आदी शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.