सोलापूर – 26 नोव्हेंबर 2025 रोजी प्रशालेमध्ये संविधान दिन व शहीद दिन साजरा करण्यात आला. प्रथमत: भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.संविधान व शहीद दिन याविषयी प्रशालेचे मुख्याध्यापक जयसिंग गायकवाड यांनी विचार व्यक्त केले. संविधान दिनानिमित्त प्रशालेतील शिक्षिका सुवर्णा धारेराव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच नवनीत प्रकाशनाने आयोजित केलेल्या जिल्ह्यातस्तरय चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
चित्रकलेत यश विद्यार्थ्यांच व मार्गदर्शक कलाशिक्षक शांतप्पा काळे यांच अभिनंदन केले. या कार्यक्रमास पर्यवेक्षक वसंत गुंगे तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
















