पंढरपूर – गेली एकोणीस वर्षे पंढरीत कार्यरत असणाऱ्या कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवरायांच्या विचारांचा व इतिहासाचा प्रसार व प्रचार व्हावा या उदात्त हेतूने भव्य किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा शालेय व खुल्या अशा दोन गटात घेतल्या जाणार आहेत. शालेय गट इयत्ता पहिली ते दहावी असा असून दुसरा खुला गट इयत्ता ११वीते पुढे असा राहील. दोन्ही गटात प्रथम क्रमांकास रोख रुपये ३००० +, संस्थेचे मानचिन्ह, दुस-या क्रमांकास रुपये २०००+संस्थेचे मानचिन्ह, तिसऱ्या क्रमांकास १०००रुपये + संस्थेचे मानचिन्ह व प्रत्येक सहभागींना सहभागी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. दि ५ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर पर्यंत सदर स्पर्धा संपन्न होणार आहे.
तरी ज्यांना ज्यांना स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी खाली दिलेल्या कोणत्याही नंबरवर सम्पर्क करून दि.१ नोव्हेंबर पर्यंत प्रवेशिका भराव्यात . वेळेनंतर प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत. अधिक माहिती साठी
९८३४४४४६११ ,९८१२३६९२९२ आणि ९०११५७७६७७ या क्रमांकावर सम्पर्क साधावा.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कलासाधनाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत बडवे महाजन यांच्यासह मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. विनायक परिचारक, सचिव ज्ञानेश्वर मोरे, या स्पर्धेचे कार्यकारी अध्यक्ष अमरसिंह चव्हाण , डॉ. कैलाश करांडे, राजेंद्र माळी, प्रा. मंदार परिचारक, अरिहंत कोठाडिया, राजकुमार आटकळे, रणजीत पवार, डॉ. बसवराज सुतार, डॉ. आनंद भिंगे,डॉ. किरण बहिरवाडे, अभिराज बडवे, प्रा. राजेंद्र मोरे, राजकुमार शहा, प्रद्युम्न कमठाणकर , बसवराज बिराजदार, अमृतभाई शहा, अनंता नाईकनवरे, महेश देशपांडे, नारायण बडवे, प्रथमेश वांगीकर, अशोक अवताडे,अक्षय बडवे पाटील,महेश अंबिके, शिवाजी यादव,आदी कलासाधनाचे सर्व सदस्य प्रयत्नशील आहेत. सदर स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
Post Views: 21