पिलीव – माळशिरस तालुका वकील संघटनेच्या 2026_27 ह्या वर्षासाठी कार्यकारणी निवडणुकीसाठी झालेल्या निवडणुकीत पिलीव येथील ॲड सत्यजित केशव गलांडे यांची तर उपाध्यक्षपदी ॲड मनोज जाधव यांनी विजय मिळविला. अध्यक्षपदासाठी ॲड सत्यजित गलांडे व ॲड अल्ताफ आतार या दोघांमध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली यामधये ॲड सत्यजित गलांडे यांनी 28 मतांनी विजय मिळविला. तर उपाध्यक्षपदासाठी ॲड मनोज जाधव व ॲड पृथ्वीराज पाटील यांच्यात लढत झाली यामध्ये ॲड मनोज जाधव यांनी 109 मतांच्या फरकाने विजय मिळविला. तर महीला उपाध्यक्षपदी ॲड रजनी गाडे, सचिवपदी ॲड डी एस आडत, सहसचिवपदी ॲड वैशाली कांबळे, खजिनदारपदी ॲड महेश काळे यांच्या बिनविरोध निवडी झालया. यावेळेस निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड एन एस कदम यांनी तर सहहायक म्हणून ॲड डि डी कदम यांनी काम पाहीले. ॲड सत्यजित केशव गलांडे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा पिलीवचे माजी सरपंच संग्राम पाटील, माजी चेअरमन आनंद पाटील, ज्येष्ठ पत्रकार दामोदर लोखंडे, राजाभाऊ मदने, श्यामराव गलांडे, हनुमंत मदने,लहु पाटील,रामभाऊ गलांडे यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. ह्या निवडीबद्दल त्यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन व कौतुक होत आहे. फोटो _ ॲड सत्यजित गलांडे यांचा सत्कार करताना मान्यवर.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
























