कंधार / नांदेड . तालुक्यातील ग्रामीण भागातील छोट्याशा गावातील सर्व सामान्य कुटुंबातील डॉ. प्रा .प्रशांत प्रदीप इंगोले यांना विद्यावाचस्पती पदवी प्रदान करण्यात आला.
प्रा. प्रशांत प्रदीप इंगोले यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांची मानव्य शाखेतील इंग्रजी या विषयात पी.एच.डी. पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली आहे त्यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे वाघिरे महाविद्यालय सासवड येथील इंग्रजी विभाग व संशोधन केंद्र मार्फत रिचर्ड पॉवर्स व कीम स्टॅन्ली रॉबिन्सन यांच्या निवडक कादंबऱ्या मधील पर्यावरण शास्त्र आणि मानवी अस्तित्व, “Ecology and Human Existence in the Selected Novels of Richard Powers and Kim Stanley Robinson”
या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला होता, रिचर्ड पॉवर्स आणि किम स्टॅन्ली रॉबिन्सन हे समकालीन इंग्रजी साहित्यातील महत्त्वाचे लेखक असून त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू पर्यावरणशास्त्र आणि मानवी अस्तित्व हा आहे. रिचर्ड पॉवर्स आपल्या कादंबरीत वृक्ष, जंगल आणि मानवी जीवन यांच्यातील अतूट नातेसंबंध अधोरेखित करतो. तर किम स्टॅन्ली रॉबिन्सन आपल्या कादंबऱ्यांमधून हवामान बदल, पर्यावरणीय संकटे आणि त्यांचे मानवी समाजावर होणारे परिणाम प्रभावीपणे मांडतो.
या विषयाची महत्त्वाची भूमिका म्हणजे मानवाला निसर्गाचा मालक नव्हे तर त्याचा एक भाग असल्याची जाणीव करून देणे. पर्यावरणाचा ऱ्हास मानवी अस्तित्वालाच धोका निर्माण करतो, हे दोन्ही लेखक ठामपणे मांडतात. या विषयाची समज आपल्याला पर्यावरणसंरक्षण, शाश्वत विकास आणि नैतिक जबाबदारीची जाणीव करून देते. त्यामुळे मानवी भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी निसर्गाशी समतोल साधणे अत्यावश्यक आहे.
हरीभाई व्ही. देसाई महाविद्यालयाचे प्रा. डॉ. महावीर सांकला यांनी मार्गदर्शन केले.
वाघिरे महाविद्यालयात नव्याने सुरू झालेल्या इंग्रजी संशोधन केंद्रातून पीएचडी प्राप्त करणारा हा द्वितीय क्रमांकाचा संशोधन विद्यार्थी आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य. पंडित शेळके, संशोधन विभागाचे प्रमुख व उपप्राचार्य डॉ. संजय झगडे व इतर संशोधन विभागाचे विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग आणि सहकारी आणि मित्रपरिवार यांनी त्यांचे स्वागत केले आहे.

















