सोलापूर : महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ हे माध्यमिक स्तरावरील शारीरिक शिक्षण या विषयाचे व शारीरिक शिक्षण शिक्षक यांचे विविध प्रश्न सोडवणूकीसाठी आणि विषयाच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, संचलित सोलापूर जिल्हा माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक यांची कार्यकारिणीची निवड नुकतीच संपन्न झाली.
यामध्ये श्री. उमेश चव्हाण सर यांची सोलापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे. जिल्हा उपाध्यक्ष पदी श्री. मनीष नाईकनवरे सर श्री. नागेश पाटील सर कार्याध्यक्ष पदी श्री. सचिन गोतसूर्य सर सचिवपदी श्रीकृष्ण कोळी सर सहसचिव पदी श्री. अमोल मिरगणे सर, नेताजी पवार सर खजिनदारपदी श्री. राजेंद्र चव्हाण सर, सोलापूर जिल्हा संघटकपदी श्री शुभम तकिक श्री अमोल पवार श्री अहमद मुलाणी श्री सोमनाथ चव्हाण श्री किशोर सुळ यांची निवड झाली आहे. तसेच सोलापूर जिल्हा सदस्य श्री. तात्यासाहेब साठे श्री.विजय दत्तू श्री.राहुल हजारे श्री.प्रशांत बाबर श्री.जितेंद्र भालेराव श्री.वैभव राऊत श्री.रोहित सुरवसे श्री.प्रदीप शिर्के श्री.आनंद देशपांडे सोलापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून श्री. नामदेव खारे तर सोलापूर जिल्हा प्रसिद्धी सचिव श्री.पंचाक्षरी स्वामी श्री श्याम आरगडे यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, पुणे संचलित महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांच्या व तालुक्यांच्या कार्यकारणींची निवड प्रक्रिया चालू आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्हा कार्यकारणी नुकतीच पार पडली.
कार्यकारणीची निवड प्रक्रिया महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक श्री.संदिप मनोरे सर व सचिव प्रा.तायाप्पा शेंडगेस जिल्हा मार्गदर्शक श्री प्रदीप नवले सर श्री अंकुश आडकिले सर व सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली. निवड झालेल्या नूतन कार्यकारणीचे जिल्ह्यातील शिक्षण क्रीडा शिक्षक व क्रीडा प्रेमी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

























