अक्कलकोट – कोल्हापूर येथील श्री स्वामी समर्थ मनमंदिर सेवा केंद्र प्रणित गिरनार दत्तभक्त परिवार कडून येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या भक्त निवास हॉलमध्ये एक दिवसीय गुरूलीलामृत पारायण सोहळा संपन्न झाला. मंदीर समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गिरनार दत्तभक्त परिवाराचे हे उपक्रम मोठ्या भक्ती भावात पार पडले. यावेळी गिरनार दत्तभक्त परिवार कडून प्रथमेश इंगळे यांचा शाल, श्रीफळ देवृन सत्कार करण्यात आला. या एक दिवसीय पारायण सोहळ्यात पुरूष व महिला मिळून एकूण ७० भाविक सहभागी झाले होते.
यावेळी श्री स्वामी समर्थ मनमंदिर सेवा केंद्रचे संस्थापक अध्यक्ष संतोष सुभाष गोसावी माऊली, सेवा केंद्राचे सदस्य महेश पाटील, सचिन चव्हाण, संजय कोळी, अरुण गवळी, समर्थ गोसावी, संजय ठाणेकर, सतीश मोरे, सर्जेराव बर्गे, महादेव पाटील, भरत सुतार, रोहिणी ठाणेकर, पूजा जाधव, मेघा पुणेकर, सोनाली गवळी, वंदना कोळी, जयश्री गोसावी, भाग्यश्री पाटील, मनीषा मडवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक भाविकांकडून पारायण सेवा श्री स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करण्यात आली.
यावेळी बोलताना मनमंदिर सेवा केंद्रचे संस्थापक अध्यक्ष संतोष सुभाष गोसावी यांनी श्री स्वामी समर्थाच्या पावन वास्तव्य भुमीत पारायण सेवा करण्याचे फळ म्हणजे सुखी, समाधानी जीवनाची गुरुकिल्ली आहे. शास्वत समाधान प्राप्त करून घेण्याचा हा थोर मार्ग आहे. तो भाविकांच्या जीवनात प्राप्त व्हावा हा उद्देश या पारायण सेवेच्या मागे आहे. श्री स्वामी समर्थ सर्वांचे कल्याण करतीलच, मंदीर समितीने आम्हाला येथे पारायण सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल समितीचे प्रमुख महेश इंगळे यांचे विशेष आभार मानत असल्याचे मनोगत व्यक्त केले.
यावेळी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, संजय पाठक, दर्शन घाटगे, धनराज स्वामी, तुषार मोरे आदींसह भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.
























