बार्शी – दि. २४ फेब्रुवारी रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी या विद्यालयातून एकूण २४६ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले होते. त्यापैकी १८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १०० पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ८५ इतकी आहे आणि आदित्य दिपक म्हेत्रे हा विद्यार्थी १५३ गुण मिळवून विद्यालयातून प्रथम आलेला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सचिन देशमुख, सुरेश डिसले, संग्राम देशमुख व सुजित लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी.वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष पी.टी. पाटील, सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य अरुण देबडवार,खजिनदार जे.सी. शितोळे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती के.डी.धावणे, उपमुख्याध्यापक आर.बी. सपताळे, पर्यवेक्षिका श्रीमती एन.बी.साठे, पर्यवेक्षक मदने के.जी., सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.
























