दक्षिण सोलापूर – राष्र्टसंत गाडगेबाबा यांनी समाज सुधारणासाठी मोठ्या प्रमाणात हालअपेष्टा सहन केले.त्यांनी आयुष्यभर स्वच्छता, शिक्षण, माणुसकी आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्य केले. हातात खराटा (झाडू) घेऊन गावोगावी फिरत त्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला आणि ‘मानवसेवा हीच ईश्वरसेवा’ मानली. त्यांनी गरिबांसाठी, दलितांसाठी शाळा, धर्मशाळा आणि रुग्णालये उभारली. माणुसकीचा धर्म रुजवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य सरकारने ग्रामस्वच्छता अभियान सुरू केले.
स्वच्छता व जनजागृती क्षेत्रातील गाडगे महाराजांचे कार्य समाजासाठी दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन भंडारकवठेचे सरपंच भीमाशंकर बबलेश्वर यांनी केले. ग्रामचायत कार्यालय भंडारकवठे येथे राष्ट्रसंत गाडगेमहाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच बबलेश्वर बोलत होते. भंडारकवठे ग्रामपंचायत कार्यालयात परीट समाज व्यवसायिक प्रशांत परीट यांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्याप्र तिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी सरपंच भीमाशंकर कल्लाप्पा बबलेश्वर,ग्रामपंचायत अधिकारी .ज्ञानेश्वर कोळी,ग्रामपंचायत सदस्य सोमनिंग कमळे,गोटू बबलेश्वर,रायप्पा कदम, ग्रामपंचायत लिपिक अनिल घंटे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष धरेप्पा तेली,संतोष बिराजदार यांनीही राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस वंदन करून अभिवादन केले.
























