किनवट – भारतीय जनता पक्षाच्या ४४ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून भाजपचे खंबीर नेतृत्व भीमराव केराम यांनी पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला. “पक्षाची विचारधारा ही केवळ राजकारण नसून ती राष्ट्रसेवेचे माध्यम आहे,” अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.
यावेळी बोलताना आमदार भीमराव केराम म्हणाले की, आज भारतीय जनता पक्ष जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनला आहे, याचे संपूर्ण श्रेय हे बूथ स्तरावर अहोरात्र कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांना जाते. सामान्य माणसाच्या सुख-दु:खात धावून जाणारा कार्यकर्ता हीच पक्षाची खरी ताकद आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने राबवलेल्या लोककल्याणकारी योजनांचा उल्लेख करत केराम यांनी सांगितले की, “उज्ज्वला योजना, किसान सन्मान निधी आणि आयुष्मान भारत यांसारख्या योजनांमुळे गरिबांच्या जीवनात परिवर्तन आले आहे. या योजनांचा लाभ प्रत्येक गरजू व्यक्तीला मिळवून देणे हीच खऱ्या अर्थाने पक्षाची सेवा ठरेल.”
‘एकात्म मानववाद’ हाच आमचा आत्मा पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेला ‘एकात्म मानववाद’ आणि ‘अंत्योदय’ अर्थात शेवटच्या माणसाचा उदय हा विचार घेऊनच आपल्याला पुढे जायचे आहे. समाजातील वंचित, शोषित आणि पीडित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
आगामी काळात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आणि विकासाची गंगा घराघरात पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहनही आमदार भीमराव केराम यांनी यावेळी केले. या संदेशामुळे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून सोशल मीडियावरही त्यांच्या या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.


















