अक्कलकोट – अहिंसा परमो धर्म या गांधीजींच्या ब्रीद वाक्यास अनुसरून श्री स्वामी समर्थांनी जगाला शांतीचे संदेश दिले आहेत. अनेक नास्तिक लोकांना आस्तिक घडवून त्यांना सदाचाराची शिकवण दिलेली आहे व भक्ती मार्गात आणले आहे, त्यामुळे श्री स्वामी समर्थांचे हे मूळस्थान म्हणजेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे विश्वशांतीचे संदेश स्थान असल्याचे मनोगत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे चिरंजीव समीर भुजबळ यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटुंब भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी समीर भुजबळ यांचा सपत्नीक श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी समीर भुजबळ बोलत होते. पुढे बोलताना समीर भुजबळ यांनी स्वामी महाराज यांचे संदेश आम्हाला शांती, समृद्धी आणि विश्वशांतीच्या मार्गावर चलण्याची प्रेरणा देतात. त्यामुळे आज अनेक भक्त स्वामी भक्तीच्या मार्गात येत आहेत व नियमितपणे स्वामींचा नाम जप करीत आहेत. कारण स्वामींच्या नामजपाने जीवनात व आंतर आत्म्यात शांती, स्थैर्य निर्माण होत असल्याची प्रचिती अनेक भावीक यांना येत आहे, म्हणून प्रत्येक भाविकांना येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात येऊन महिन्यातून एकदा तरी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेणे क्रम प्राप्त असल्याचे मनोगतही व्यक्त केले.
याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी समीर भुजबळ व कुटुंबीयांना श्री स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवाची पत्रिका देऊन श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीस येण्याबाबत आमंत्रित केले. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, प्रथमेश इंगळे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, विपुल जाधव, प्रा.शिवशरण अचलेर, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते.
फोटो ओळ – श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात समीर भुजबळ कुटुंबीयांचा सपत्निक सत्कार करताना चेअरमन महेश इंगळे दिसत आहेत.
















