पंढरपूर – येथील पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचालित द.ह.कवठेकर प्रशालेत बाल संस्कार शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. संस्थेचे मानद सचिव सु.रा.पटवर्धन यांच्या हस्ते या बाल संस्कार शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
प्रारंभी या छोट्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन पटवर्धन, द.ह.कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही. एम. कुलकर्णी, जेष्ठ पर्यवेक्षक आर.एस. कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री.शेलार, ज्येष्ठ शिक्षक प्रशांत मोरे, समीर दिवाण, ज्येष्ठ कलाशिक्षक अमित वाडेकर, श्री. खिस्ते, सौ. वर्षा मोरे,श्रीमती. पी.एम.कुलकर्णी व इतर सर्व सहकारी शिक्षकशिक्षकांनी या सर्व छोट्या मुलांचे पुष्पवृष्टीने स्वागत केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविका मध्ये द.ह. कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही. एम. कुलकर्णी म्हणाले की संस्कार वर्ग चालू करण्याची गरज सध्या समाजात प्रकर्षाने जाणवत आहे आणि शाळा यागोष्टी ओळखूनच या संस्कार वर्गाचे आयोजन करत आहे. विनामूल्य असणाऱ्या या बालसंस्कार शिबिरात मुलांवर देशभक्तीचे, सामाजिक मूल्यांचे आणि इतर अनेक उत्तम संस्कार देणार आहे. ज्यामुळे पुढील पिढी संस्कारक्षम बनण्यास मदत होईल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती.पी.एम. कुलकर्णी यांनी केले. आभार व्यक्त करताना ज्येष्ठ पर्यवेक्षक आर.एस. कुलकर्णी यांनी मुलांना शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिले.
—————–
चौकट : ( मुलांवर योग्य संस्कार व्हावेत हिच अपेक्षा )
बालचमुना मार्गदर्शन करताना संस्थेचे मानद सचिव श्री.पटवर्धन यांनी सांगितले की,संस्कार वर्गाचे आयोजन करण्या मागचा उद्देश म्हणजे स्टेजवर बसलेली छोटी छोटी ही मुलं उद्याचे आदर्श नागरिक बनावे हाचप्रमुख उद्देश आहे. सध्या समाजात संस्कारांची दिसलेली कमतरता ही प्रकर्षाने जाणवत आहे. माणुसकी हीन समाज जर बनत चालला तर समाजात माणसांवर विश्वास राहणार नाही. सध्याच्या आयटीच्या, एआयच्या जमान्यात सगळं कृत्रिम चालू असताना संस्कार बाजूला पडताना दिसत आहेत. लहान मुले, मोठी मुले मोबाईलच्या आहारी जाऊन एकलकोंडे बनत चालले आहेत. त्यांना पुन्हा समाजात आणण्यासाठी समाजातल्या लोकांचं महत्त्व पटवून देण्यासाठी असे संस्कार शिबिर ठिकठिकाणी आयोजित करावेत अशीच अपेक्षा मी या शिबिरातून व्यक्त करतो असे सांगून यातून थोडे जरी विद्यार्थी सुसंस्कारित झाले तरी ती आपली भविष्यातील गुंतवणूकच आहे असे मला वाटते. माझा उद्याचा भारत सुसंस्कारित, सुजलाम सुफलाम बनावा हीच अपेक्षा ठेवून या मुलांवर योग्य संस्कार व्हावे अशी अपेक्षा मी त्यांच्या गुरुजनांकडून करतो. आज संस्कार केलेला विद्यार्थी उद्याचा सुसंस्कारित आदर्श नागरिक निश्चित बनेल असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला.


























