
श्रीपूर मध्ये विद्युत रोहित्रला आग लागली मात्र दुर्घटना टळली
श्रीपूर – मध्ये आज सकाळी सात ते अकरा पर्यंत लोडशेडींग ठेवण्यात आले होते . सव्वा अकराच्या दरम्यान विजपुरवठा सुरू झाला आणि डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मारक शेजारी असलेल्या महावितरणच्या विद्युत रोहित्र ला अचानक आग लागली हा रस्ता रहदारीचा आहे तसेच लगतच खाजगी दवाखाना आहे आग लागल्याने एकच गोंधळ व पळापळ सुरू झाली त्याच वेळी दवाखान्यात हजर असलेले डॉ . सुहास बनसोडे यांनी त्यांच्या दवाखान्यातील अग्नी शामक यंत्र बाहेर आणून सदर आग विझवली व त्यांनी विद्युत महावितरण कंपनीच्या कार्यालयात फोन करून घटनेची माहिती दिली . यावर त्वरीत वीज पुरवठा खंडित करण्यात आला . डॉ . बनसोडे यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे . तसेच विद्युत रोहित्र चे मोठे नुकसान टळले आहे त्या नंतर सकाळी सव्वा अकरा पासून श्रीपूर मध्ये काही भागात संध्याकाळी साडे पाच वाजले तरी वीज पुरवठा सुरळीत झालेला नव्हता . सध्या कडक उन्हाळा सुरू आहे त्यामुळे नागरिकांना प्रचंड उन्हाचा सामना करावा लागत आहे .
गेल्या दिड वर्षांपूर्वी याच ठिकाणी रात्री साडे नऊ वाजता विद्युत रोहित्र ला आग लागली होती . या धोकादायक विद्युत रोहित्र अन्यत्र हटवण्यासाठी कार्यकारी अभियंता महावितरण अकलूज विभाग यांना निवेदन देण्यात आले होते तसेच या बाबत बातम्याही देण्यात आल्या होत्या परंतु संबंधित अधिकारी यांनी दखल घेतली नाही .
या विद्युत रोहित्र लगत खाजगी दवाखाना तसेच समोर डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे हा धोकादायक विद्युत रोहित्र अन्यत्र हटवून संभाव्य धोका टाळावा अशी मागणी रहिवाशांनी केली आहे .
Post Views: 7