Tuesday, July 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पंढरपूरात पालिकेकडून अतिक्रमण विरोधी कारवाईस सुरुवात

तरुण भारतbyतरुण भारत
May 22, 2026
in west maharashtra
0
पंढरपूरात पालिकेकडून अतिक्रमण विरोधी कारवाईस सुरुवात
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर  – पंढरपूर नगरपालिकेने शहरातील विठ्ठल मंदिर परिसर, नगरप्रदक्षिणा मार्ग येथे अतिक्रमण विरोधी कारवाई सुरु केली आहे. पोलिस बंदोबस्ता मध्ये कारवाई केल्यामुळे अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पालिकेच्या कारवाईमुळे सध्या मंदिर परिसरातील रस्ते प्रशस्त आणि मोकळे वाटू लागले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांसह भाविकांमधून देखील समाधान व्यक्त केले जात आहे.
सध्या अधिकमास सुरु असल्यामुळे पंढरपूरात दररोज भाविकांची मांदियाळीआहे. भाविकांच्या गर्दीमुळे शहरात वारंवार वाहतूकीची कोंडी निमार्ण होत होती. विठ्ठलरुक्मिणी मंदिर परिसरात तर अतिक्रमणामुळे भाविकांना रस्त्यावरुन चालणे देखील जिकरिचे होवून बसले होते. मंदिर परिसरात तात्पुरत्या व्यापाऱ्यांनी चक्क रस्त्यांवरच मोठ्याप्रमाणावर अतिक्रमण करुन अक्षरश: रस्ते व्यापुन टाकले होते. या तात्पुरत्या स्वरुपात व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांमुळे मंदिर परिसरातील कायमस्वरुपी दुकानदार देखील वैतागून गेलेले होते. कारण कायमस्वरुपी दुकानां समोर हातगाडे लावून ही मंडळी आपले व्यवसाय करीत होती. दरम्यान अधिक
मास त्यामुळे होणारी भाविकांची गर्दी तसेच गर्दी आणि अतिक्रमणामुळे वारंवार होणारी वाहतूकीची कोंडी यामुळे शहरातील नागरिकां बरोबरच परगावाहून येणारे भाविक देखील वैतागून गेलेले होते. त्यामुळे पालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी पोलिसांच्या मदतीने शहरात बुधवार पासून अतिक्रमण विरोध मोहिमेस प्रारंभ केला. स्वत: मुख्याधिकारी तसेच येथील उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे, शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे जातीने रस्त्यावर थांबुन अतिक्रमणे काढण्याचे आवाहन करीत आहेत. पोलिसांचा बंदोबस्त असल्यामुळे अतिक्रमण पथकातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना देखील अतिक्रमण केलेल्या व्यापाऱ्यांकडून फारसा विरोध होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे विठ्ठल मंदिर परिसरातील रस्ते, नगरप्रदक्षिणा मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चौफाळा आदी रस्ते आता मोकळे दिसु लागलेले आहेत.
दरम्यान पालिकेने राबविलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेमुळे शहरातील नागरिकांबरोबरच भाविकांची देखील रस्त्यांवरील अतिक्रमणे निघाल्यामुळे जाण्या येण्याची चांगली सोय होवू लागली आहे. ही अतिक्रमण मोहिम काही दिवसांपूर्तीच राबवु नये. त्यामध्ये सातत्य ठेवावे नाही तर अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून पुन्हा अतिक्रमणे करुन रस्त्यांवर अडथळे निर्माण केले जावू शकतात. त्यामुळे पालिकेकडून अतिक्रमण विरोधी मोहिमे मध्ये सातत्य ठेवणे गरजेचे असल्याचे शहरातील सुज्ञ नागरिकांमधून बोलले जात आहे. पालिकेने पोलिसांच्या सहकार्याने अधिक महिन्याच्या वाढत्या गर्दीमुळे शहरात सुरु केलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाई बद्दल शहरातील नागरिक तसेच भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
——————-
चौकट : ( गंध लावणाऱ्या मुलांचा होतो उपद्रव )
विठ्ठल मंदिर परिसरात गंध लावण्याऱ्या मुलांच्या संख्येत कमालीची वाढ झालेली दिसत आहे. ही मुले विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कमालीचे हैराण करताना दिसतात. त्यामुळे अनेक वेळा भाविकांना या मुलांकडून नाहक त्रास दिला जातो. अनेकदा वादाचे प्रसंग देखील उद्भविताना दिसून येतात. त्यामुळे पोलिसांनी गंध लावणाऱ्या मुलांना देखील शिस्त लावण्याची गरज असल्याचे भाविकांमधून बोलले जात आहे.
—————-
चौकट : ( अतिक्रमण पथकाने कायमच दक्ष्षता घ्यावी )
पालिकेकडून पोलिसांच्या सहकार्याने
अतिक्रमण विरोधी मोहिम राबविल्यामुळे शहरातील मंदिर परिसरातील रस्ते मोकळा श्वास घेऊ लागल्याचे दिसत आहे. मात्र पालिकेच्याअतिक्रमण विरोधी पथकाने सातत्याने अशा प्रकारे मंदिर परिसरात फिरुन अतिक्रमणे होणारनाहीत, फेरीवाले लोक रस्ता व्यापून आपल्या व्यवसाय करणार नाहीत, हातगाड़ी वाले मंडळीरस्त्यावर हातगाड्या लावून आपल्या मालाची विक्री करणार नाहीत याची दक्षता घेतली पाहिजे.जर पालिकडून दुर्लक्ष झाले तर लगेचच व्यापारी पुन्हा अतिक्रमण करुन रस्ता व्यापुन टाकण्यासमागेपुढे पहात नाहीत. त्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कायमच दक्ष राहून कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे आहे.
Post Views: 40
Previous Post

पिलीव येथे अनधिकृत गॅस विक्रेत्याकडून ग्राहकांची मोठी आर्थिक लुट, पुरवठा विभाग लक्ष देणार का ?

Next Post

दीड हजार थांबताच वाढली धावपळ ; लाडकी बहीण योजनेवर महिलांचा संताप

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

दीड हजार थांबताच वाढली धावपळ ; लाडकी बहीण योजनेवर महिलांचा संताप

ताज्या बातम्या

इंद्रायणीला महापूर वारकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचे सार्वजनिक आवाहन #viral #maharashtranews #news

July 6, 2026

मंद गतीने चालणाऱ्या कामाचा निषेध केला हटके स्टाईलने #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

B2 च्या जमिनीचा प्रश्न मार्गी लागणार #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

अबब त्या चोराला पकडायला 200 सीसीटीव्ही तपासले #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

बटगिरी कारखानाला आग दोन महिलांना वाचवले #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

कुंभारी एमआयडीसीच्या प्रस्तावाला उद्योगच्या समितीचा हिरवा कंदील #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

मिसिंग लिंकला पहिल्याच पावसात फटका #viral #maharashtranews #marathinews

July 6, 2026

निराळे वस्ती मनोहर झोपडपट्टी अतिक्रमण हटविले….. #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0962127

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!