Thursday, July 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मॉडेल क्रिकेट ॲकॅडमी आणि केपीसीए संघांचे विजय

तरुण भारतbyतरुण भारत
June 4, 2026
in sports
0
मॉडेल क्रिकेट ॲकॅडमी आणि केपीसीए संघांचे विजय
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

​सोलापूर – येथे सुरू असलेल्या ७९ व्या रेल्वे स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धेत आज खेळवल्या गेलेल्या सामन्यांमध्ये मॉडेल क्रिकेट ॲकॅडमी आणि के पी क्रिकेट ॲकॅडमी (केपीसीए) या संघांनी आपापल्या सामन्यात विजय संपादन केले.

सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात ख्वाजा बंदेनवाज ‘ब’ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मॉडेल क्रिकेट ॲकॅडमीने निर्धारित २० षटकांत ७ बाद १७६ धावांचा मजबूत धावसंख्या उभारली. यात विवेक अंची याने ६९ धावांची आणि सुमित येवले याने ४७ धावांची उत्कृष्ट खेळी केली. वैष्णव जावळेने १६ धावांचे योगदान दिले. ख्वाजा बंदेनवाज ‘ब’ कडून गोलंदाजीत जावद आली, जावेद अहमद, रिजवान आणि रितेश वाडकर यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

​१७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ख्वाजा बंदेनवाज ‘ब’ संघाचा डाव १९.५ षटकांत १३४ धावांवर आटोपला. संघाकडून लखन चव्हाणने ४०, रितेश वाडकरने ३३ आणि शेख केफने २६ धावा केल्या. मॉडेल ॲकॅडमीकडून जयराज कुंमणे याने ४ षटकांत ३५ धावा देत ४ बळी घेतले. विवेक अंचीने २ बळी तर स्वराज वाले, सुमित अहिवळे आणि गौरव वाडे यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. मॉडेल क्रिकेट ॲकॅडमीने हा सामना ४२ धावांनी जिंकला. उत्कृष्ट कामगिरीबद्दल विवेक अंची याला सामनावीर घोषित करण्यात आले. वरिष्ठ खेळाडू (मुंबई पोलीस/शिवाजी विद्यापीठ) सुधाकर सिद्धू यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी विक्रांत पवार, वासुदेव धोरणाल, अतुल बांदेवाडीकर व सचिन गायकवाड उपस्थित होते. या सामन्यात मोहित दिकोंडा व शुभम मुतुर यांनी पंच म्हणून तर सचिन गायकवाड यांनी गुणलेखक म्हणून काम पाहिले.

​

दुपारच्या सामन्यात ख्वाजा बंदेनवाज ‘अ’ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. प्रथम फलंदाजी करताना के पी क्रिकेट ॲकॅडमीचा संघ २० षटकांत ११५ धावांवर सर्वबाद झाला. यात ओंकार कोरेने ३५, गौरी प्रसाद स्वामीने २५ आणि दिनेश शिंगाडेने १६ धावा केल्या. ख्वाजा बंदेनवाज ‘अ’ कडून नितेश वी. याने ४ षटकांत १५ धावा देऊन ३ बळी घेतले, तर जकवानने २ आणि कासिफ अहमदने १ बळी घेतला.

​प्रत्युत्तरादाखल खेळताना ख्वाजा बंदेनवाज ‘अ’ चा डाव १४.१ षटकांत अवघ्या ८१ धावांत गडगडला. संघाकडून सईद जागीदारने २३, मिर्झा वसीमने १० आणि कासिफ अहमदने १० धावा केल्या. केपीसीएकडून दिनेश शिंगाडेने घातक गोलंदाजी करत ४ षटकांत १६ धावा देऊन ४ बळी घेतले. यश मंगरूळेने २, तर श्रेयस सुरवसे आणि सनी पोळ यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. के पी क्रिकेट ॲकॅडमीने या सामन्यात ३४ धावांनी विजय मिळवला. ४ बळी आणि १६ धावा करणाऱ्या दिनेश शिंगाडे याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. वरिष्ठ खेळाडू अंबादास तोरा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी लियाकत शेख, अतुल बंदेवाडीकर आणि सचिन गायकवाड उपस्थित होते. या सामन्यात महेश सोनवणे व शुभम मुतुर यांनी पंच म्हणून तर सचिन गायकवाड यांनी गुणलेखक म्हणून काम पाहिले.

​आजचे सामने

  • ​सकाळी : सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट ‘बी’ विरुद्ध श्री स्वामी समर्थ क्रिकेट क्लब, अक्कलकोट.
  • ​दुपारी : के पी सी ए विरुद्ध साऊथ सोलापूर आपटे.
Post Views: 62
Previous Post

लेह-लडाख येथे सांगोल्यातील तरुणाचा अपघाती मृत्यू

Next Post

हुलजंती रोड वर माल ट्रकच्या धडकेत मरवडेचा दुचाकीस्वार ठार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

हुलजंती रोड वर माल ट्रकच्या धडकेत मरवडेचा दुचाकीस्वार ठार

ताज्या बातम्या

आषाढी यात्रेत ढोलक्यांना मागणी, ढोलकी विक्रीसाठी खास उत्तरप्रदेशातून कारगीर पंढरीत दाखल

आषाढी यात्रेत ढोलक्यांना मागणी, ढोलकी विक्रीसाठी खास उत्तरप्रदेशातून कारगीर पंढरीत दाखल

July 23, 2026
मंगळवेढ्यात कॉलेज परिसरात मोकाट फिरणार्‍या 13 रोड रोमिओंवर पोलीसांची कारवाई

मंगळवेढ्यात कॉलेज परिसरात मोकाट फिरणार्‍या 13 रोड रोमिओंवर पोलीसांची कारवाई

July 23, 2026
“धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सोलापुरात माकपचे आक्रमक आंदोलन

“धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सोलापुरात माकपचे आक्रमक आंदोलन

July 23, 2026
शिवसेनेकडून केंद्रातील मोदी सरकार विरुद्ध निषेधाचा ठराव

शिवसेनेकडून केंद्रातील मोदी सरकार विरुद्ध निषेधाचा ठराव

July 23, 2026
विद्यार्थी आंदोलनावरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ तिरडी मोर्चा

विद्यार्थी आंदोलनावरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ तिरडी मोर्चा

July 23, 2026

२७ ते २९ जुलै ‘शाहिरी महोत्सवा’तून महाराष्ट्राच्या लोकशाहीर परंपरेचा होणार जागर

July 23, 2026
बंदच्या हाकेला अक्कलकोट तालुक्यात प्रतिसाद 

बंदच्या हाकेला अक्कलकोट तालुक्यात प्रतिसाद 

July 23, 2026
वंचितच्या बंदचा कांदा बाजाराला फटका ! बाजार समितीत सकाळ सत्रात कामकाज ठप्प ; दुपारनंतर लिलाव सुरळीत 

वंचितच्या बंदचा कांदा बाजाराला फटका ! बाजार समितीत सकाळ सत्रात कामकाज ठप्प ; दुपारनंतर लिलाव सुरळीत 

July 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0994029

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!