सोलापूर – भरधाव वेगातील ट्रक ने धडक दिल्याने एक वीस वर्षीय दुचाकी स्वार ठार झाल्याची घटना मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती रस्त्यावर बुधवारी संध्याकाळी घडली.
अशोक नंदकुमार जावळे (वय 22 वर्ष , रा. मरवडे ,तालुका मंगळवेढा ) असे त्या मयत तरुणाचे नाव असून तो बुधवारी दुचाकीवरून निघाला असताना हुलजंती रोड येथे एका अज्ञात माल ट्रकने त्याला धडक दिली . या धडकेत तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला. त्याला उपचाराकरिता एका रुग्णवाहिकेतन येथील शासकीय रुग्णालयात रात्री आठ वाजता दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारादरम्यान रात्री अकरा वाजता मृत्यू झाला.
Post Views: 5