पंढरपूर – श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे जतन वसंवर्धन करण्यासाठी गुरुवारी मंदिरात तज्ज्ञ व्यक्तींमार्फत निरीक्षण करण्यात आले. आषाढीयात्रेपूर्वी मूर्तीचे दीर्घकालीन जतन व संवर्धन करण्यासाठी भारतीय पुरातत्त्वसर्वेक्षण, राज्य पुरातत्त्व विभाग तसेच मूर्ती संवर्धन क्षेत्रातीलतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक सल्लामसलत करून निर्णय घेण्यात येणारअसल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी दिली.
बैठकीस मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समिती सदस्य, सल्लागार परिषद सदस्य, स्थानिक महाराजमंडळी, भारतीयपुरातत्त्व सर्वेक्षण व राज्य पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, मूर्ती संवर्धनतज्ज्ञ तसेच पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी सांगितले की, भारतातील एकमेव असे मंदिर आहे जिथे भाविकांना पददर्शन घेतायेते. मूर्ती दीर्घकाळ टिकावी यासाठी तिचे जतन व संवर्धन करणे अत्यावश्यक आहे.वज्रलेप करण्याबाबत तज्ज्ञांनी आपली मते मांडली असून कोणती पद्धत वापरायची याबाबत पुरातत्त्व विभागाचा सल्ला घेऊन दोन ते तीन दिवसांत निर्णय घेण्यात येईल. दररोजच्या नित्योपचारात दही, दूध, मध यांसारख्या पदार्थांचा वापर होत असल्याने मूर्तीच्या आतील बाजूस काही नुकसान झाले आहे का, याची तपासणी करण्यासाठी लायडार स्कॅन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र स्कॅनिंगमुळे मूर्तीला हानी होऊ शकते का, याचा अभ्यास करूनच निर्णय घेण्यात येईल. यासाठी केंद्रशासनाची परवानगी आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले की, श्री विठ्ठलाची मूर्ती स्वयंभू असून वारकरी भाविकांचा श्वासआहे. मूर्तीचे जतन व संवर्धन मंदिर समितीमार्फत पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येईल. वज्रलेप करण्यास समितीचा विरोध नाही, मात्र सर्वमहाराज मंडळी व तज्ज्ञांच्या सामोपचाराने निर्णय घेतला जाईल.
कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले की, मूर्ती जतन आणि संवर्धनाच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजनाकरण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, छत्रपती संभाजीनगर तसेच राज्यपुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सल्लामसलत करून पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेण्यात येईल.
बैठकीत पद्मश्री पुरस्काराने सन्मानिततज्ज्ञ एस.सुब्रमण्यम, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण छत्रपती संभाजीनगरचे उपअधीक्षक डॉ.विनोद कुमार, सेवानिवृत्त अधिकारी विलास मंगीराज, सहाय्यक संचालक डॉ.विलास वाहने, आशीर्वाद ऐरानी, विकास सावंत व महेशाचार्य उत्पात यांनी मूर्ती संवर्धना संदर्भातील तांत्रिक बाबींवर मार्गदर्शन केले. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची
मूर्तीप्राचीन असून पूर्वीपासून नैसर्गिक पद्धतीने वज्रलेपन करण्यात येत होते. हीच पद्धत पुढेही वापरावी, अशी सूचना रामकृष्ण महाराज वीर यांच्यासह अन्य महाराज मंडळींनी बैठकीत केली.
Post Views: 18