Friday, September 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

स्पा मसाज सेंटरच्या आडून सुरु होता जुगार अड्डा

तरुण भारतbyतरुण भारत
June 11, 2026
in crime
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
बार्शी – सोलापूर जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात सुरु असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत बार्शी तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत नागोबाचीवाडी हद्दीतील बायपास वरील एका स्पा मसाज सेंटरच्या आडून सुरु असलेला जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत १२ लाख ३१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
बार्शी तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक रात्र गस्तीवर असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, बार्शी-लातूर बायपास रोडवरील नागोबाचीवाडी हद्दीत असलेल्या ‘लक्झरी डिलक्स स्पा मसाज सेंटर’मध्ये पैशांची पैज लावून ‘तिरट’ नावाचा जुगार खेळला जात आहे.
माहितीची खातरजमा करुन सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बुधवार दि.१० जून रोजी मध्यरात्री २.१५ वाजण्याच्या सुमारास स्पा सेंटरवर अचानक छापा टाकला. यावेळी आतमध्ये १० जण जुगार खेळताना रंगेहाथ आढळून आले.
प्राथमिक तपासात सदर जुगार अड्डा आकाश हनुमंत काशीद (रा. कसबा पेठ, बार्शी) आणि स्पा सेंटरचा व्यवस्थापक बाळू चौधरी यांच्या संगनमताने चालविला जात असल्याचे निष्पन्न झाले. मात्र पोलिसांच्या कारवाईची चाहूल लागताच बाळू चौधरी घटनास्थळावरुन फरार झाला. यावेळी आकाश हनुमंत काशीद, मतीन शेख, रामा कबाडे, शंतनू कदम, जमीर पटेल, किरण दहिहांडे, संदीप वाणी, उदय ढेरे, शाम नायकोजी (सर्व रा. बार्शी), नितीन उबाळे (रा. चिंचगाव, ता. माढा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीसांकडून रोख, ९ महागडे मोबाईल फोन (आयफोन, सॅमसंग, व्हिवो), दोन दुचाकी, स्कार्पिओ चारचाकी वाहन असा एकूण १२,३१,१०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुरेश बिरकले यांच्या फिर्यादीवरुन महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) अन्वये बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ खांडेकर हे करीत आहेत.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने, पोहेकॉ सोमनाथ खांडेकर, पोकॉ सुरेश बिरकले, पोकॉ महंमदगौस महेदी आणि चालक लक्ष्मण चिट्टलवाड यांनी केली.
Post Views: 57
Previous Post

पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसारआषाढी वारी पूर्वी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे जतन व संवर्धन – जिल्हाधिकारीएस. कार्तीकेयन

Next Post

डॉ . यशवंत कुलकर्णी यांचा उत्तम व्यवस्थापन कौशल्या बद्दल आरपीआय तर्फे सत्कार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
डॉ . यशवंत कुलकर्णी यांचा उत्तम व्यवस्थापन कौशल्या बद्दल आरपीआय तर्फे सत्कार

डॉ . यशवंत कुलकर्णी यांचा उत्तम व्यवस्थापन कौशल्या बद्दल आरपीआय तर्फे सत्कार

ताज्या बातम्या

कुसमोड येथील पुनम लवटे हिची सहहायक महसुल अधिकारीपदी निवड

कुसमोड येथील पुनम लवटे हिची सहहायक महसुल अधिकारीपदी निवड

September 11, 2026
कृषी व्यवस्थेतील कणा असलेल्या ‘नंदी महाराजां’चे संवर्धन करणाऱ्या जनक टेकाळे यांना ‘भगवान वृषभ रत्न पुरस्कार’ जाहीर

कृषी व्यवस्थेतील कणा असलेल्या ‘नंदी महाराजां’चे संवर्धन करणाऱ्या जनक टेकाळे यांना ‘भगवान वृषभ रत्न पुरस्कार’ जाहीर

September 11, 2026
वैरागच्या विकासासाठी मुंबई मंत्रालयात मोठी घडामोड: ग्रामीण रुग्णालयासाठी विशेष निधी

वैरागच्या विकासासाठी मुंबई मंत्रालयात मोठी घडामोड: ग्रामीण रुग्णालयासाठी विशेष निधी

September 11, 2026

मंदिरात पूजा करण्यास विरोध करून दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण- वृद्धासह तिघे जखमी

September 11, 2026
कक्ष अधिकारी श्रीकांत यादव यांनी स्वीकारला कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार

कक्ष अधिकारी श्रीकांत यादव यांनी स्वीकारला कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार

September 11, 2026

शिवसेनेचे अमोल शिंदे यांच्या विरोधानंतर मंजुर झालेला विषय तहकूब

September 11, 2026

धोकादायक शाळा, वसतिगृह आणि प्रलंबित ई-निविदांवर बांधकाम समितीचा ‘ॲक्शन मोड’- उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांची माहिती

September 11, 2026

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमात सर्वांनी सहभाग घ्यावा #solapurnews #viral #news

September 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1191803

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!