
श्रीपूर – श्रीपूर ता. माळशिरस येथिल कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ . यशवंत कुलकर्णी यांनी कार्यकारी संचालक म्हणून कारखान्याची धुरा हाती घेवून एक तपा पेक्षा ( १२ वर्ष ) कार्यकाळ लोटला या काळात डॉ . कुलकर्णी यांनी व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर कारखान्याची प्रगती करत विशेषत: कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन १० हजार मे.टना चे वर नेली, सातत्याने ऊस उत्पादक सभासदांना एफआरपी पेक्षा जास्त दर देणे , डिस्टलरी क्षमता ९० हजार लिटर प्रतिदिन करणे, या बरोबरच कोवीड काळात ऑक्सीजन निर्मिती , वृक्षारोपण, या सारखे सामाजीक उपक्रम राबविणे या कार्याची दखल घेवून कारखान्यास विविध पुरस्कार मिळवून दिले . या बरोबरच डॉ . यशवंत कुलकर्णी यांच्या या कार्याची दखल घेवून विविध संस्थांनी त्यांचा गौरव केला . या अनुषंगाने त्यांना नुकताच ग्रीन वर्ल्डचा रिअल अचिव्हर्स पुरस्कार मिळाला एकूणच डॉ . यशवंत कुलकर्णी यांचे कार्य संस्था व इतरांसाठी आदर्श असल्याने त्यांचा आर पी आय च्या वतीने ज्ञानेश्वर सुरवसे, शैलेश साबळे , महादेव सावंत, सागर भोसले यांचे वतीने पुणेरी पगडी, शाल व बुके देवून सत्कार करण्यात आला .
Post Views: 11