कुर्डूवाडी –

ज्ञान, विज्ञान व सुसंस्कारासाठी शिक्षण प्रसार हे ब्रीद घेऊन जनसेवा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ कुर्डूवाडी, संचलित जिव्हाळा सुसंस्कार विद्यामंदिर कुर्डूवाडी विद्यालयाचा 23 वा वर्धापन दिन संस्थापक अध्यक्ष मा.श्री शिवराज वायचळ मुख्याध्यापिका मा. श्रीम. सारिका गोटे यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला .
10 जून 2004 रोजी संस्थापक अध्यक्ष माननीय श्री शिवराज वायचळ व सचिव अजित वायचळ यांनी या संस्थेची स्थापना केली.
आज 23 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. प्रारंभी संस्थापक अध्यक्ष माननीय श्री शिवराज वायचळ यांच्या शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
दीप प्रज्वलन करून केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
23 वर्षातील गुणवत्तेचा आढावा , विद्यालयाने केली उत्तुंग कामगिरी नाविन्यपूर्ण उपक्रम, SQAAF बाह्य मूल्यांकनात A+ गुणांकन घेत विद्यालयाचे नाव पहिल्या 40 शाळांच्या यादीत संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचले.
या भूषणावह बाबीसह शैक्षणिक वर्ष 2026- 27 मध्ये जापनीज भाषा विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी विद्यालय प्रयत्नशील आहे. हा
नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे जिव्हाळा सुसंस्कार विद्यामंदिर हे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव आहे.
यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , पालक यासह इयत्ता दहावीच्या ज्यादा तासात उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
Post Views: 49