पुणे/लोणी काळभोर २३ जून ः रुग्णाला कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेने चीर, भूल किंवा छाती न उघडता रुग्णाच्या ह्दयाच्या झडपेचे कार्य ‘ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट’ (टीएव्हीआर) प्रक्रियाने पूर्ववत करून ७५ वर्षीय रुग्णाला नव जीवनदान देण्याचे कार्य लोणी काळभोर येथील माईर्सच्या विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केले. विशेष म्हणजे सुमारे दीड तास चाललेल्या या प्रक्रियेदरम्यान रुग्ण पूर्णपणे शुद्धीत होता आणि वैद्यकीय टीमशी संवाद ही साधत होता. अशी माहिती विश्वराज हॉस्पिटलचे ह्दयरोग तज्ज्ञ डॉ. सूरज इंगोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी विश्वराज हॉस्पिटलचे एमडी डॉ. सुजीथ कुमार आणि ऑपरेशन्स एचओडी डॉ. संतोष साहू उपस्थित होते.
डॉ. सूरज इंगोले यांनी सांगितले की, संबंधित रुग्ण ७५ वर्षीय पुरूष असून त्यांचा ह्दयविकाराचा वैद्यकीय इतिहास गुंतागुंतीचा होता. १५ वर्षापूर्वी त्यांची कोरोनरी आर्टरी बायपास शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर २ वर्षापूर्वी ह्दयविकाराचा झटका आल्यावर एन्जीओप्लास्टी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना एओर्टिक व्हॉल्व्ह स्टेनोसिस ह्दयाची मुख्य झडप अरुंद होत असल्याचे निदान झाले. त्यांना अधूनधून चक्कर येणे आणि श्वास घेण्यास त्रास होता. वाढते वय आणि यापूर्वी झालेल्या दोन ह्दयविकराच्या प्रक्रिया पाहता पारंपरिक ओपन हार्ट शस्त्रक्रियाद्वारे झडप बदलणे अत्यंत जोखमीचे होते. यामुळे विश्वराज हॉस्प्टिलच्या ह्दयरोग तज्ज्ञांच्या टीमने रुग्णासाठी सर्वात सुरक्षित पर्याय म्हणून (टीएव्हीआर) जी एक (मिनिमली इनव्हेसिव्ह) कमीतकमी छेद घेणारी आणि शस्त्रक्रिया विरहित पद्धतीचा उपयोग करण्याचे ठरविले.
या प्रक्रियेमध्ये मांडीतील रक्तवाहिनीत सुईद्वारे एक छोटे छिद्र करुन ह्दयापर्यंत पोहोचले जाते. एका वायरच्या साहाय्याने कॅथेटरद्वारे नवीन झडप व्हॉल्व्ह नेली जाते आणि ती थेट खराब झालेल्या झडपेच्या जागी अचूकपणे बसवितात. या प्रक्रियेमध्ये छातीवर कोणताही चीरा किंवा छाती उघडण्याची गरज भासत नाही. ही एक कमीत कमी आक्रमक शस्त्रक्रियाविरहित प्रक्रिया आहे. रूग्णाची छाती न उघडता ह्दयातील व्हॉल्व्ह बदलला जातो.
टीएव्हीआर हे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजीमधील एक मोठे यश आहे. ज्यांना पारंपरिक शस्त्रक्रियेचा जास्त धोका असतो त्यांच्या साठी ही प्रक्रिया वापरली जाते. यामध्ये एओर्टिक व्हॉल्व्ह स्टेनोसिस असलेल्या रुग्णांसाठी नवीन शक्यता निर्माण केल्या आहेत. ही कमी जोखमीची प्रक्रिया असून रुग्ण त्यांच्या बरे होण्याच्या गतीनुसार ४८ तासांत किंवा तीन ते पाच दिवसांत घरी परत येऊ शकतात.
डॉ. सुजीथ कुमार यांनी सांगितले की, रुग्णाला प्रक्रियेच्या आदल्या दिवशी दाखल करण्यात आले होते. प्रक्रियेनंतर दुसर्याच दिवशी त्यांना चालण्यास सांगण्यात आले आणि चौथ्या दिवशी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. पारंपारिक ओपन हार्ट शस्त्रक्रियेमध्ये अशा प्रकारच्या जलद बरे होण्याच्या कालावधीची कल्पनाही करता येत नाही. यात कोणतीही शस्त्रक्रियेची जखम राहत नाही. तसेच बरे होण्यासाठी दीर्घकाळ लागणारी प्रक्रियाही करावी लागली नाही. एका महिन्यानंतरच्या तपासणीत रुग्ण उत्तम स्थितीत असून त्यांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत.
रुग्णाने सांगितले की, आम्ही घाबरुन शोध सुरू केला आणि त्यानंतर विश्वराज हॉस्पिटल मधील डॉ. इंगोले यांना भेटलो. ज्यांनी आम्हाला आश्वासन दिले की टीएव्हीआर माझ्यासाठी सुरक्षित असेल. ते पुढे म्हणाले, रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टर सौहार्दपूर्ण होते.
विश्वराज हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अदिती राहुल कराड यांच्या मार्गदर्शनात हे हॉस्पिटल सातत्याने रुग्ण सेवा करीत आहेत. हे हॉस्पिटल ३००हून अधिक बेड चे सुपर स्पेशालिटी टर्शियरी केअर रुग्णालय आहे. हे आरोग्यसेवेवर लक्ष केंद्रित करुन ह्दयरोगशास्त्र, ह्दय शस्त्रक्रियासाठी आणि इतर वैद्यकीय शाखांमध्ये प्रगत सेवा प्रदान करते.
ही प्रक्रिया ह्दयरोग तज्ज्ञ डॉ. सूरज इंगोले यांनी पाडली. भूलतज्ज्ञ डॉ. क्षितिज गायकवाड आणि डॉ. दीपक कवडे, सहाय्यक डॉ. विष्णू आणि डॉ. अनघा, तंत्रज्ञ मनोज आणि कल्याण तसेच स्टाफ नर्स अमित आणि मीना यांनी सहकार्य केले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

















