Tuesday, June 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जि.प.आरोग्य विभागाचा महसुली विक्रम ना हरकतीतून ४.४३ कोटींची कमाई

तरुण भारतbyतरुण भारत
June 23, 2026
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
     सोलापूर – जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, जुलै २०१३ ते मे २०२६ या कालावधीत विविध आरोग्यविषयक नाहरकत प्रमाणपत्रांच्या माध्यमातून जिल्हा परिषद सेस निधीत तब्बल ४ कोटी ४३ लाख १६ हजार १०० रुपये जमा झाले आहेत. या कालावधीत एकूण २ हजार ६१० नाहरकत प्रमाणपत्रे निर्गमित करण्यात आली. आरोग्य सेवा क्षेत्राशी संबंधित विविध संस्था, वैद्यकीय व्यवसायिक, रुग्णालये आणि इतर आरोग्यविषयक घटकांना ही प्रमाणपत्रे देण्यात येतात.
          दरम्यान, सोलापूरच्या जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत विविध आरोग्यविषयक नाहरकत प्रमाणपत्रे (एनओसी) आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या आंतरवासिता प्रशिक्षण पूर्णत्व दाखल्यांमधून गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात महसूल जमा झाला असून, हा निधी गंभीर आजारांनी ग्रस्त गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी वापरला जात आहे. महसूल निर्मिती आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल साधणारा हा उपक्रम जिल्हा परिषदेसाठी महत्त्वाचा ठरत आहे.
          जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून दरवर्षी मिळणाऱ्या महसुलामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. अनेक प्रकारच्या परवानग्या, नूतनीकरणे, आरोग्य संस्थांच्या मान्यता आणि इतर प्रशासकीय प्रक्रियांसाठी नाहरकत प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. या प्रक्रियेद्वारे शासनाने निश्चित केलेले शुल्क आकारले जाते आणि त्यातून प्राप्त होणारी रक्कम जिल्हा परिषद सेस निधीत जमा केली जाते.
            याशिवाय विनाअनुदानित वैद्यकीय व आयुर्वेदिक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आंतरवासिता प्रशिक्षण पूर्णत्व दाखल्यांमधूनही जिल्हा परिषदेला महसूल मिळत आहे. मार्च २०२२ ते मे २०२६ या कालावधीत एकूण ४१७ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण पूर्णत्व दाखले देण्यात आले. त्यापैकी शुल्क आकारण्यात आलेल्या विद्यार्थ्यांकडून ६ लाख ४० हजार ५०० रुपये सेस निधीत जमा झाले आहेत. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा दाखला महत्त्वाचा असल्याने त्याची मागणी सातत्याने वाढत आहे.
            आरोग्य विभागाकडून जमा होणाऱ्या या निधीचे वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ महसूल म्हणून न राहता थेट समाजोपयोगी कार्यासाठी वापरला जातो. जिल्हा परिषदेकडून या सेस निधीतून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना प्रत्येकी १५ हजार रुपये पात्र लाभार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाते. विशेषतः किडनी विकार, हृदयरोग आणि कर्करोग यांसारख्या खर्चिक उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांना या निधीतून आर्थिक सहाय्य मिळते. त्यामुळे अनेक गरजू कुटुंबांना उपचाराचा दिलासा मिळत असून आरोग्य विभागाच्या या उपक्रमाला सामाजिक संवेदनशीलतेची जोड मिळाली आहे.
कोट
महसूल वाढीस हातभार
आरोग्य विभागाकडून महसूल संकलनाची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि प्रभावी करण्यात आली आहे. विविध प्रमाणपत्रे, परवानग्या आणि दाखल्यांचे कामकाज नियमबद्ध पद्धतीने पार पाडले जात असल्याने महसूलवाढीसही हातभार लागत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने या निधीचा योग्य वापर करून गरजू नागरिकांपर्यंत मदत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.
– डॉ. सतीश कोपूरवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी.
चौकट
गरजू रुग्णांना आर्थिक मदत मोलाची
एकीकडे आरोग्य क्षेत्राशी संबंधित प्रशासकीय सेवांमधून महसूल मिळत असताना दुसरीकडे त्याच निधीतून गंभीर आजारांनी ग्रस्त नागरिकांना जीवनदायी मदत मिळत असल्याने हा उपक्रम ‘सेवा आणि समाजकारण’ यांचा उत्तम संगम ठरत आहे. आगामी काळातही या माध्यमातून अधिकाधिक निधी उपलब्ध होऊन गरजू रुग्णांना सहाय्य मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Post Views: 14
Previous Post

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन

Next Post

निकिता लाड हिने केली बीडीएस पदवी संपादन 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
निकिता लाड हिने केली बीडीएस पदवी संपादन 

निकिता लाड हिने केली बीडीएस पदवी संपादन 

ताज्या बातम्या

सलीम खान संघाचा दास्ताने संघावर शानदार विजय

सलीम खान संघाचा दास्ताने संघावर शानदार विजय

June 23, 2026

वारीपूर्व नियोजनाला वेग; जि.प.ची सभा पंढरपुरात घेण्याचा प्रस्ताव अध्यक्षांच्या टेबलावर  

June 23, 2026

राज्यस्तरीय महानगरपालिका विशेष शिक्षक चर्चासत्र उत्साहात संपन्न

June 23, 2026
संग्राम दोस्ती गणेश मंडळाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

संग्राम दोस्ती गणेश मंडळाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

June 23, 2026
सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत यांच्या विजयाचा पिलीव येथे भाजपच्या वतीने जल्लोष

सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत यांच्या विजयाचा पिलीव येथे भाजपच्या वतीने जल्लोष

June 23, 2026

“बालसुरक्षेसाठी दुहेरी आरोग्य कवच’; अतिसारमुक्त बालपणसह पोलिओमुक्त भविष्याकडे सोलापूरची वाटचाल 

June 23, 2026

पोलिओचा धोका शून्यावर’ ठेवण्यासाठी जिल्हा सज्ज

June 23, 2026
खाशाबा जाधव पुरस्काराने ऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील गौरवित

खाशाबा जाधव पुरस्काराने ऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील गौरवित

June 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0931144

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697