सोलापूर : शेळगी येथील निकिता राजेश लाड हिने बीडीएस (Bachelor of Dental Surgery) पदवी यशस्वीरित्या संपादन करून कुटुंबासह परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या या यशाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार आणि शुभचिंतकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
निकिता हिने कठोर परिश्रम, अभ्यासातील सातत्य आणि ध्येयाप्रती असलेल्या चिकाटीच्या बळावर हे यश मिळविले. शिक्षणाच्या प्रवासात आई-वडिलांचे मार्गदर्शन आणि पाठबळ महत्त्वाचे ठरल्याचे तिने सांगितले. बीडीएस पदवी संपादन केल्यानंतर पुढील उच्च शिक्षण घेऊन दंतवैद्यकीय क्षेत्रात अधिक प्रावीण्य मिळविण्याचा तसेच रुग्णांना दर्जेदार सेवा देण्याचा मानस असल्याचे डॉ. निकिता लाड हिने व्यक्त केले. निकिताचे वडील नोकरी करीत असून आई गृहिणी आहेत. आई-वडिलांकडून मिळालेले संस्कार, समाजसेवेची भावना आणि मेहनतीची शिकवण यामुळेच यशाचा हा टप्पा गाठता आल्याचे तिने नमूद केले.
Post Views: 10