करकंब – करकंब पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे यांनी नागरिकांना वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे महत्त्व अधोरेखित करत जागरूकतेचे आवाहन केले आहे.१८ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांनीच वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) काढून वाहन चालवावे. पालकांनी विशेष जबाबदारी घेत १८ वर्षांखालील मुलांना व विद्यार्थ्यांना वाहन चालविण्यास देऊ नये असे स्पष्टपणे सांगितले.समाजात दिवसेंदिवस अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असून अनेक निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे.ही अत्यंत चिंताजनक बाब असून, प्रत्येकाने स्वतःची व इतरांची सुरक्षा लक्षात घेऊन वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.जीवन अमूल्य आहे. थोडासा निष्काळजीपणा मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे वाहन चालविताना हेल्मेट, सीटबेल्टचा वापर करा,वेग मर्यादेत ठेवा आणि नियमांचे पालन करा. करकंब परिसरात सुरक्षित व शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्थेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.
Post Views: 11