सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियानांतर्गत प्रभाग क्रमांक १२ मधील संगमेश्वर नगर, अक्कलकोट रोड येथील अंगणवाडी क्रमांक १३२ (केंद्र क्रमांक ३२८) तसेच रश्मी हांचाटे प्रशाला येथे आज लहान बालकांना पल्स पोलिओ लसीचे दोन थेंब पाजून अभियानाची सुरुवात महापौर विनायक दादा कोंड्याल यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी महापौरांनी पालकांशी संवाद साधत, पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू देऊ नका. आपल्या परिसरातील सर्व नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपल्या मुलांना निश्चितपणे पोलिओचे दोन थेंब पाजावेत, असे आवाहन केले.
या प्रसंगी माजी नगरसेवक राजकुमार हांचाटे, नगरसेवक सिद्धेश्वर कमटम, रामदास मगर, योगेश सोनावणे, डॉ. प्रसन्नजीत वाघचौरे (वैद्यकीय अधिकारी, मुद्रासन सिटी नागरी आरोग्य केंद्र), पीएचएन शैलेश सानप, एएनएम सपना खैरे तसेच आशा सेविका अंबिका देढे उपस्थित होत्या.
Post Views: 11