सोलापूर : एमआयडीसी पोलिसांनी आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवित असताना एका तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक केली आहे.
नितीश अनिल चव्हाण (वय ३२, रा. स्वामी समर्थ मंदिर शेजारी, शिवाजी नगर, बाळे, मूळ रा. होटगी, ता. दक्षिण सोलापूर) असे त्या अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत
२७ जून रात्री ११ ते २८ जून पहाटे ४ वाजेपर्यंत कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात येत होते.या दरम्यान, एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सोलापूर-अक्कलकोट रोडवरील बीएसएनएल टॉवरजवळ सर्व्हिस रोडवर एक इसम संशयितरीत्या येणार असून, त्याच्याकडे गावठी कट्टा आहे.या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, कमरेला लपवलेला गावठी कट्टा पोलिसांना मिळून आला.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त प्रितम यावलकर, सहायक पोलीस आयुक्त प्रताप पोमण व वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि उल्फाज शेख, राकेश पाटील, सुहास अर्जुन, नागेशसिंग चव्हाण, अमरसिंग शिवसिंगवाले आणि अविनाश दिगोळे यांनी बजावली आहे.
Post Views: 11