सोलापूर – यंदाच्या वर्षी श्री शेगांव गजानन महाराज पालखी दि 18/07/26 शनिवार रोजी कुचन हायस्कूल येथे मुक्कामी राहणार आहे दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीसुद्धा शेगांव गजानन पालखीतील वारकऱ्याना महाप्रसाद देण्याची अधिकार पत्र आज रोजी श्री शेगांव गजानन महाराज सोलापूर जिल्हा समिती प्रमुख सुनील फाळके व सुनील कुलकर्णी यांनी हरि ओम विणकर बाग बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बालाजी जंगम यांच्याकडे सुपूर्त केले. त्यावेळी संस्थेचे पदाधिकारी लक्ष्मीकांत दंडी, हिरालाल धुळम, इराण्णा चानशेट्टी, अशोक यज्जा, रुक्मण्सा दौलताबाद, गणेश सिद्धम, जगदीश बोंबड्याळ उपस्थित होते,.
सदर पत्र संस्थेला मिळाल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष जंगम यांनी समिती प्रमुखांचे आभार मानले
Post Views: 16